अनेक महिला आणि मुलींना अंडरआर्म्सच्या काळपटपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळेच अनेकदा स्लीवलेस ड्रेसना बायदेखील म्हणावं लागतं. अंडरआर्म्सचा कलर डार्क होण्यामागे अनेक कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि घरगुती टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही अगदी काही वेळातच अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करू शकता. 

अंडरआर्म्स कलर डार्क होण्याची काही कारणं  : 

  • वॅक्स करताना जास्त गरम वॅक्स वापर केल्याने
  • हेयर रिमूवल क्रीममध्ये असलेले केमिकल्स
  • अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेझरचा वापर करणं
  • हॉर्मोनल डिसबॅलेंस
  • जास्त टाइट कपडे वेअर करणं
  • डियोड्रंटचा जास्त वापर 
  • अंडरआर्म्स स्वच्छ न केल्यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणं

 

अशातच अंडरआर्म्सचा रंग उजळवण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय वापरणं ठरतं फायदेशीर : 

बहुउपयोगी लिंबू 

लिंबाचे अनेक फायेद आहेत. हे एक नॅचरल ब्लीच आहे, जे डार्क स्किन लाइट करण्याचं काम करतं. याव्यतिरिक्त हे डेड स्किन स्वच्छ करण्यासाठीही मदत करतं. नियमितपणे अंडरआर्म्सवर लिंबाचा रस लावल्याने काळपटपणा दूर होण्यास मदत होते. लिंबाचा रस लावल्यानंतर अंडरआर्म्स थंड पाण्याने धुवून टाका आणि मॉयश्चरायझर अप्लाय करा. काही दिवसांसाठी डिओड्रंट लावणं बंद करा. लिंबाच्या रसामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी डार्क कलर काढून टाकून त्वचेचा मूळ रंग परत मिळवण्यासाठी मदत करतो. 

बटाटाही करतो मदत 

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे बटाट्याचा वापर केल्याने तुमची अंडरआर्म्सची त्वचा नॅचरल पद्धतीने ब्लीच होण्यास मदत होते. बटाट्याचा रस किंवा तुकडे अंडरआर्म्सवर लावल्याने त्वचेवर तयार झालेले काळपटपणाचे पॅच काही दिवसांमध्येच दूर होतात. याव्यतिरिक्त तुम्ही बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून अंडरआर्म्सवर लावू शकता. 

बेकिंग सोडा ठरतो फायदेशीर 

अंडरआर्म्सच्या भागांमध्ये डेड स्किन सेल्स जास्त जमा होत राहतात आणि अंडरआर्म्सची त्वचेचा रंग डार्क होतो. बेकिंग सोडा पाण्यामध्ये एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्टच्या मदतीने अंडरआर्म्सवर स्क्रब करा. यामुळे अंडरआर्म्सची रोमछिद्र ओपन होतात आणि दुर्गंधीही दूर होते. तुम्ही बेकिंग सोड्यामध्ये खोबऱ्याचं तेलही एकत्र करून मसाज करू शकता. 

बेसन आणि दह्याची पेस्ट
 
बेसन एक उत्तम स्क्रब आहे, जे त्वचेवरील डेड स्किन सेल्स दूर करून इव्हन टोनसाठी मदत करतात. दह्यामध्ये असलेलं लॅक्टिक अॅसिड त्वचेला कंडिशनिंग करण्यासोबतच सॉफ्टही करते. बेसन आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा. त्वचेचा रंग उजळवण्यास मदत होते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: How to get rid of dark underarms home remedies will help you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.