मेकअप करताना टॅल्कम पावडरचा वापर करताय? मग 'या' टिप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 04:51 PM2019-02-14T16:51:59+5:302019-02-14T16:53:04+5:30

आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. मेकअपमध्ये इतर ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा सर्वचजण वापरत असलेलं ब्युटी प्रोडक्ट म्हणजे, टॅल्कम पावडर. फक्त स्त्रियाच नाही तर अनेक पुरूषही या पावडरचा वापर करतात.

How to apply talcum powder in makeup | मेकअप करताना टॅल्कम पावडरचा वापर करताय? मग 'या' टिप्स करा फॉलो

मेकअप करताना टॅल्कम पावडरचा वापर करताय? मग 'या' टिप्स करा फॉलो

googlenewsNext

आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. मेकअपमध्ये इतर ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा सर्वचजण वापरत असलेलं ब्युटी प्रोडक्ट म्हणजे, टॅल्कम पावडर. फक्त स्त्रियाच नाही तर अनेक पुरूषही या पावडरचा वापर करतात. टॅल्कम पावडर फक्त घाम शोषून घेणं आणि सुगंधासाठीच वापरली नाही जात तर, मेकअप सेट करण्यासाठीही याचा वापर करता येतो. अनेक तज्ज्ञही टॅल्कम पावडरचा वापर करण्याचा सल्ला देत असतात. अशातच तुम्हीही मेकअप दरम्यान पावडरचा वापर करत नसाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स...


 
1. मेकअप टिकवण्यासाठी ठॅल्कम पावडरचा वापर करू शकता. मस्करा लावण्याआधी थोडीशी टॅल्कम पावडर लावा. त्यामुळे आयलॅश मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होते. यामुळे आयलॅश मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होते. टॅल्कम पावडर लावताना डोळे बंद ठेवा, ज्यामुळे डोळ्यांना काही त्रास होणार नाही. 

2. मेकअप बेस म्हणून टॅल्कम पावडरचा उत्तम वापर होऊ शकतो. मेकअपचा चिकटपणा आणि चेहऱ्याच्या तेलकट लूकपासून बचाव करण्यासाठी थोडीशी टॅल्कम पावडर लावा. ही तुमचा मेकअप सेट करण्यासाठी मदत करते आणि जास्त तेल शोषून घेते. 

3. वॅक्सिंग केल्यानंतर होणारं स्किन इन्फेक्शन किंवा लाल रॅशेजपासून बचाव करण्यासाठी वॅक्स करण्याआधी टॅल्कम पावडरचा वापर करू शकता. ज्या भागात वॅक्स करायचे आहे. तिथे थोडीशी पावडर लावा त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन मुलायम होण्यास मदत होते. 

4. टॅल्क एक उत्तम ड्राय शॅम्पूचंही काम करतो. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तसेच सिल्की केसांसाठी केसांच्या मुळांना थोडीशी टॅल्कम पावडर लावा. जास्त असलेलं तेल शोषून घेण्यासाठी आणि केसांना सिल्की लूक देण्यासाठी टॅल्कम पावडर मदत करते. पण लक्षात ठेवा असं केल्यानंतक केस धुवून टाका आणि हा उपाय नियमितपणे करू नये. 

5. टॅल्कम पावडर शरीरावरील घामाचा दुर्गंध दूर करण्याचं काम करतं. जर त्वचेला खाज येत असेल तर ती दूर करण्यासाठी थोडीशी पावडर वापरा. 

Web Title: How to apply talcum powder in makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.