शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

​नशेमुळे कमी होते चुक-बरोबर कळण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2016 3:14 PM

नियमित ड्रग्सचे सेवन करणार्‍या व्यक्तीची तर चांगले-वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमतासुद्धा व्यसनामुळे कमी होते

कुठलेही व्यसन वाईटच असते. नियमित ड्रग्सचे सेवन करणार्‍या व्यक्तीची तर चुक आणि बरोबर, योग-अयोग्य, चांगले-वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमतासुद्धा व्यसनामुळे कमी होते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. नैतिकता आणि भावनांचे मुल्यांकन करणार्‍या मेंदूच्या भागावरच ड्रग्स आघात करतात.अनेक वर्षांपासून ड्रग्सचे व्यसन आणि गुन्हेगारी वृत्तीचा संबंध असतो असे मानले जाते. परंतु ड्रग्समुळे मेंदूच्या विशिष्ट भागाची  होणारी झीज गुन्हेगारी वृत्तीस कारणीभूत असते का याविषयी मात्र पुरेसे पुरावे नव्हते. कोकेन आणि मेथाम्फ्टेमाईन ड्रग्समुळे  भल्याबुर्‍याची पारख करणार्‍या मेंदूच्या भागाला हानी पोहचते हे आमच्या संशोधनामुळे प्रथमच सिद्ध झाले आहे, अशी माहिती न्यु मेक्सिको विद्यापीठातील सॅमंथा फेडे यांनी दिली.प्रस्तुत अध्ययनात नियमितपणे कोकेन आणि मेथाम्फ्टेमाईनचे सेवन करणार्‍या अमेरिकन कैद्यांच्या मेंदूची कार्यप्रणाली आणि नैतिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्यतेची निर्णयक्षमता यांचा परस्पर काही संबंध आहे का यावर संशोधन करण्यात आले. चांगले आणि वाईटातील फरक नीट न कळाल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, त्यातून समाज अमान्य कृत्य घडण्याची शक्यता जास्त असते.संशोधकांनी न्यू मेक्सिको आणि विस्कॉन्सिन कारागृहातील १३१ ड्रग्स व्यसनाधिन आणि ८० व्यसनरहित कैद्याच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केला. त्यांना कोणते शब्दप्रयोग योग्य आणि कोणते अयोग्य हे विचारण्यात येत असताना त्यांच्या मेंदूचे स्कॅन करून मज्जासंस्थेची कार्यप्रणाली रेकॉर्ड करण्यात आली. या माहितीच्या विश्लेषणातून वरील निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती ‘सायकोफार्माकॉलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात देण्यात आली.