Do not wash your hair at night know the best hair care tips | केस गळणं आणि कोरडे होण्यास कारणीभूत ठरतं 'या' वेळेला केस धुणं; आजचं सवयी बदला

केस गळणं आणि कोरडे होण्यास कारणीभूत ठरतं 'या' वेळेला केस धुणं; आजचं सवयी बदला

केसांची काळजी घेण्यासाठी केस धुणं जितकं महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे तुम्ही केस कसे धुता हे सुद्धा महत्वाचं असतं. केस धुतल्यानंतर केसांमध्ये जमा झालेली घाण बाहेर निघून जाण्यास मदत होते. जास्त हेअर वॉश केल्यानं केसांची नैसर्गिक चमक कमी होते. त्यामुळे केस कोरडे दिसू शकतात. मुलींनी आठवड्यातून दोनदा ते तीनदा केस धुवायला हवेत.

अनेक महिला या सकाळी केस धुतात. तर काहीजणी या सकाळी उठल्यानंतर घाई होऊ नये. म्हणून रात्रीच केस धुतात. पण रात्री केस धुतल्याने काही समस्यांचा सामना करावा लागतो.  त्यांमुळे त्वचेचं तसंच केसांचं नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया रात्री केस धुतल्यास केसांवर काय परिणाम होतो जाणून घेऊया.

रात्री केस धुतल्याने केसांची मुळं ही कमजोर होतात. त्यामुळे केस गळायला लागतात. रात्री केस धुवून झोपल्यानंतर केसात गुंता होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे केस कंगव्याने विंचरताना मोठ्या प्रमाणात तुटतात.  केसांचे होणारे नुकसान टाळण्यसाठी केस रात्री धुणे टाळा. रात्री केस धुतल्यानंतर ते ओले असतात. त्यामुळे केस रुक्ष पडून कोरडे पडण्याची शक्यता असते.

 सुबह के समय हेयर वॉश

केस धुतल्यानंतर जर ते  नीट सुकले नाही. तर केसांमध्ये आणि स्काल्पवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जर ते इन्फेक्शन पसरले तर केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात आणि त्यामुळे डोक्यात खाज येणे कोंडा होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. धुतलेले केस जास्त वेळ ओले राहीले तर सर्दी , ताप यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. अ‍ॅलर्जीही निर्माण होऊ  शकते. 

तसंच शांपू, कंडिशनर, यांच्या जास्त  वापराने केस कोरडे होतात. डोक्यावरील त्वचासुद्धा आजारी पडते. केसांची मुळे नष्ट होतात. केस पातळ होऊन टक्कल लवकर पडू शकते. केस लवकर पिकतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी  रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक,अंडी यांचे सेवन केल्याने केस चांगले राहतात.

सकाळी केस धुतल्यानंतर अनेक महिला आणि पुरूष ड्रायरचा वापर करतात. त्यामुळे केस जास्त कोरडे होतात. केस गळण्याची समस्याही ड्रायरचा रोज वापर केल्यामुळे उद्भवू शकते.  कधीतरी ड्रायरचा वापर करणं ठीक आहे. पण नेहमी केस धुतल्यानंतर आपोआप सुकेपर्यंत वाट पाहा सतत ड्रायर फिरवू नका.

हे पण वाचा-

केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल

तुम्हीसुद्धा साबणानं चेहरा धुता का? त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

Web Title: Do not wash your hair at night know the best hair care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.