Beauty Tips in Marathi : 3 reasons why you shouldnt use soap on your face | तुम्हीसुद्धा साबणानं चेहरा धुता का? त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

तुम्हीसुद्धा साबणानं चेहरा धुता का? त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

सगळेचजण आंघोळ करताना तोंडाला साबण लावतात. तर काहीजण  साबणाने आंघोळ करत असले तरी तोंड धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात. खरंतर अनेकदा ही पद्धत योग्य ठरते. साबणानं चेहरा धुतल्यानंतर त्वचेचं नुकसान होतं. साबणाचा वापर करताना जाणवत नसेल तरी त्वचेवर अनेक नकारात्मक परिणाम होत असतात. आज आम्ही तुम्हाला त्वचेवर साबणाचा वापर केल्याने काय दुष्परिणाम होतात. याबाबत सांगणार आहोत.

माणसांच्या त्वचेचा पीएच लेव्हल ४ ते ६.५ यामध्ये असते. त्वचा तेलकट असेल तर साबणाचा वापर  केल्यामुळे पीएच संतुलन बिघडतं. एसिड मेटल त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे त्वचेचा ग्लो कमी होतो. तुमची त्वचा तेलकट असो किंवा नसो  साबणाच्या वापराने त्वचेतील नैसर्गिक तैलग्रंथींवर परिणाम होऊन त्वचेचा ग्लो कमी होतो. त्वचा कोरडी पडते.

साबणाचा वापर टाळून तुम्ही तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असणारा किंवा तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरड्या त्वचेवर उपयुक्त असलेल्या फेसवॉश वापर करू शकता. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी,  विशारी घटक निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा चिरतरूण दिसेल. चेहरा साबणानं  धुणं म्हणजे डिशवॉश लिक्विड किंवा डिटजेंटनं धुण्याप्रमाणे आहे. 

चुकीच्या उत्पादनाांचा वापर केल्यानं त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात. केमिक्सयुक्त साबणाने चेहरा धुण्यापेक्षा  डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य फेसवॉशची निवड करून त्याचा वापर करा. त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशिल असल्यामुळे साईट इफेक्ट होण्याची शक्यता असते. बाजारात अनेक नवनवीन उत्पादनं असतात.  त्यांच्या मोहात पडून  नवीन काही ट्राय करण्यापेक्षा  तज्ज्ञांचा सल्ला  घेऊनच योग्य उत्पादनं निवडा. 

प्रत्येक साबण त्वचेसाठी नुकसानकारक ठरतो असं अजिबात नाही. अनेक साबणांमध्ये आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो. त्वचेसाठी पोषक ठरत असलेल्या घटकांचा त्यात समावेश असतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. ताजंतवानं झाल्याप्रमाणं वाटतं. म्हणून त्वचेचं होणारं नुकसान  टाळण्याासाठी योग्य साबणाचा वापर करा. 

ऑयली स्किन असणाऱ्या लोकांसाठी साबण आणि नुकसानदायी ठरू शकतो. हे स्किनमधून नॅचरल ऑइल आणि सीबम कमी करतं. त्यामुळे त्वचा कोरडी आणि शुष्क होऊ शकते. जर तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर किसी मेडिकेटिड साबणाचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच त्याचा वापर करा. 

याशिवाय घरगुती उपायांनीही तुम्ही त्वेचची काळजी घेऊ शकता

चेहरा स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर एक उत्तम उपाय आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवण्याचा विचार करत असाल तर चंदनाच्या पेस्टचा वापर करू शकता. 

अ‍ॅलोवेरा जेलमध्ये थोडी पीठीसाखर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे जवळपास १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर मसाज करून थंड पाण्याने धुवून टाका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहरा चमकदार होतो. तुम्ही कच्च दूध चेहऱ्यावर लावू शकता. 

कच्च दूध चेहऱ्यावर लावू शकता. कच्च दूध चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. 

तुम्ही लिंबाच्या रसामध्ये थोडंसं मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. जवळपास 10 मिनिटांसाठी हे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. चेहरा स्वच्छ होतो आणि त्वचा मुलायम होते. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

हे पण वाचा-

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा

Web Title: Beauty Tips in Marathi : 3 reasons why you shouldnt use soap on your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.