सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती तणावामध्ये जगत आहे. ऑफिसमधील टेन्शन, घरातील टेन्शन यांसारख्या अनेक समस्या या तणावामागील कारण आहे. आपल्या आयुष्यातील तणाव वाडल्याने आपलं संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त होतं. ज्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यासोबतच त्वचेवरही होत असतो. तणाव हृदयाची धडधड वाढते, परिणामी शरीराचे इतर अवयव प्रभावित होतात. तणावामुळे शांत झोपही लागत नाही. तसेच आपल्या खाण्याच्या बाबतीतही असंतुलन दिसून येतं. परिणामी चेहऱ्यावर रॅशेज, पिंपल्स यांसारख्या समस्या उद्भवतात. 

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कसा तणाव तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. तणावामुळे त्वचेवर वेगवेगळ्या समस्या दिसून येतात. 

पिंपल्सची समस्या

तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की, संतुलित आहार आणि चेहऱ्याच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेतल्यानंतरही चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या होते. याचं सर्राव मुख्य कारण तणाव आहे. जो तुमचं ऑफिस आणि घर यांमुळे अनेकदा वाढतो. ज्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तणाव शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढवतो. ज्यामुळे इन्सुलिन प्रभावित होतं आणि पिंपल्सची समस्या वाढते. 

सोरायसिस

तसं पाहायला गेलं तर असं सांगितलं जातं की, तणाव घेणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. कारण तणावामुळे आपम स्वतः आजारांना आमंत्रण देत असतो. यामुळे आपल्या आहारामध्ये असंतुलन दिसून येतं. परिणामी त्वचेच्या समस्यां उद्भवतात. जर तुमच्या त्वचेमध्ये लाल मोठे दाणे दिसून येत असतील तर अशा परिस्थितीमद्ये तणाव तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. चेहऱ्यावर लाल चट्टे येणं हे आजारांचं लक्षण आहे. अनेकदा या चट्ट्यांवर जळजळ होते. याच कारणामुळे सोरायसिसने पीडित लोकांना तणावामुळे अनेक समस्या होतात. तणाव सोरायसिस वाढवण्यासाठीही कारणीभूत ठरतो. यामुळे नाक आणि गळ्याजवळील त्वचेवर लाल चट्टे दिसून येतात. 

कोरडी त्वचा 

आपला आहार कितीही संतुलित असला तरिही तणाव आपल्या शरीराचं कार्य बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरतो. ज्यामुळे आपण अनेकदा आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. परिणाणी त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. तुमची त्वचा मुलायम आणि निरोगी असली तरिही दररोज त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. पण तणावात असल्यामुळे आपण त्वचेकडे दुर्लक्षं करतो.  

स्किन रॅशेज 

त्वचेवर लाल चट्टे येणं किंवा खाज वाढणं या समस्यांना स्किन रॅशेज म्हटलं जातं. जे कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीमुळे होऊ शकतात. शरीराच्या कोणत्याही भागावर सतत खाजवल्याने त्वचेवर परिणाम होतो. सतत येणाऱ्या खाजेमुळे कोणतंही काम मनापासून करणं कठिण होतं. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला नरम, कॉटनचे आणि सूती कपडे परिधान करणं उत्तम ठरतं. 

डाएट आणि आरोग्यावर परिणाम

जेव्हा तुम्ही तणावामध्ये काम करत असाल तर तुमच्या आहारावरही त्याचा परिणाम होत असतो. खाण्यामध्ये पौष्टिक आहार घेणं दूरच अनेकदा काही खाण्याची इच्छाही होत नाही. असावेळी अनेकदा जंक फूड किंवा जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केलं जातं. तणावामध्ये असलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला तणावापासून दूर ठेवण्यासाठी कॉफी, स्मोकिंग आणि अल्कोहोलचा आधार घेतात. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. संतुलित आहार न घेतल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि इतर समस्या उद्भवतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.


Web Title: Depression or stress affects your skin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.