रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान, वाचाल तर रहाल फायद्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:02 IST2024-12-14T15:01:41+5:302024-12-14T15:02:27+5:30
Alum water bath : तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान, वाचाल तर रहाल फायद्यात!
Alum water bath : आंघोळ करणं हा आपल्या रोजच्या रूटीनचा भाग आहे. कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात, कुणी थंड पाण्याने आंघोळ करतात. तर काही लोक पाण्यात काही इतर गोष्टी टाकून आंघोळ करतात. बरेच लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात. मात्र, जशा नाण्याला दोन बाजू असतात. तशाच काही गोष्टींच्याही दोन बाजू असतात. तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
- तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे त्वचेला साफ करण्यास मदत करतात. तसेच या गुणांमुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.
- तसेच घामाची येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केली जाते. तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास फ्रेश वाटतं.
- तुरटीच्या पाण्याने त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यास मदत मिळते. याने शरीराला थंडावाही मिळतो.
- तुरटीच्या पाण्याने शरीराची स्वच्छता होते. अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवरील डागही होतात.
- शाम्पूमुळे केसांची सफाई तर होते. स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरील मळ-माती शाम्पूने निघत नाही. ज्यामुळे केसांमध्ये उवा होतात. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ होते.
- जखमेवर तुरटी लावली तर रक्त वाहणं बंद होतं. एखादी जखम झाली असेल तर तुरटीच्या पाण्याने ती धुवावी याने रक्त बंद होतं. तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे जखमेला संक्रमणपासून रोखतात.
तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याने नुकसान
- तुरटीच्या पाण्याने जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. थंडीच्या दिवसात तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. ज्या लोकांची त्वचा ड्राय आहे त्यांनी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करू नये.
- ज्या लोकांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी सुद्धा तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. असं केल्यास त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात.
- त्याशिवाय जर तुम्ही रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या त्वचेतील ओलावा दूर होऊ शकतो. याने त्वचेचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.
तुरटीचे अनेक फायदे आहेत. पण याचा वापर संतुलित पद्धतीने केला जावा. याचा जास्त वापर केला तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेवर खाज आणि जळजळ होत असेल तर या पाण्याचा वापर लगेच बंद करा.