Yezdi कंपनी आठवतेय का? अहो तीच, तुमच्या आमच्या बालपणातली; तीन बाईक्स केल्या लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:45 PM2022-01-13T13:45:31+5:302022-01-13T13:49:43+5:30

Yezdi Motorcycles : Classic Legends नं लाँच केलेल्या पाहा कोणत्या आहेत बाईक्स आणि किती आहे किंमत.

Yezdi Scrambler Adventure and Roadster motorcycles launched in India Prices start from Rs 1 98 lakh jawa yezdi motorcycles | Yezdi कंपनी आठवतेय का? अहो तीच, तुमच्या आमच्या बालपणातली; तीन बाईक्स केल्या लाँच

Yezdi कंपनी आठवतेय का? अहो तीच, तुमच्या आमच्या बालपणातली; तीन बाईक्स केल्या लाँच

Next

Yezdi Motorcycles Launch : येझदीनं तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केलं आहे. येझदीने (Yezdi) भारतात अॅडव्हेंचर, स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर मोटरसायकल लाँच केल्या आहेत. येझदीच्या या नव्या बाईक्स क्लासिक लेजेंड्सच्या (Classic Legends) डीलरशीप नेटवर्कवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. याद्वारे यापूर्वी JAWA बाईक्सचीही विक्री करण्यात येत आहे.

याशिवाय, कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही या मोटरसायकल ऑनलाइन बुक करू शकता. केवळ 5 हजार रुपये भरुन तुम्हाला बाईक बुक करण्याची संधीही देण्यात आली आहे. येझदी रोडस्टर (Yezdi Roadster), स्क्रॅम्बलर (Scrambler) आणि अॅडव्हेंचर मोटरसायकल (Adventure) भारतातील रॉयल एनफिल्ड (Royal Enfield), केटीएम (KTM) आणि होंडा (Honda) यांच्या बाईक्सना टक्कर देतील.

आधुनिक तंत्रज्ञान आणि रेट्रो स्टाइल येझदी मोटरसायकलमध्ये न्यू जनरेशन लिक्विड-कूल्ड, फ्युअल इंजेक्टेड, DOHC सिंगल सिलिंडर इंजिनचा वापर करण्यात आला आहे. येझदीच्या अॅडव्हेंचर रेंजची किमत 2,09,900 रुपये, स्क्रॅम्बलर रेंजची 2,04,900 रुपये आणि रोडस्टर रेंज 1,98,142 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे.

26 वर्षांनंतर पुनरागमन
Yezdi, Mahindra Group ची कंपनी Classic Legends द्वारे भारतीय बाजारपेठेत आणण्यात आलेला हा तिसरा ब्रँड आहे. यापूर्वी क्लासिक लेजेंड्सनं जावा आणि बीएसए मोटरसायकल्स ब्रँड्स रिव्हाईव्ह केले होते. या तिन्ही मोटरसायकलसोबत Yezdi ब्रँडनं २६ वर्षांनी पुनरागमन केलं आहे. 1961 मध्ये भारतात पहिल्यांदा ही बाईक लाँच झाली होती. हा ब्रँड आपल्या रोडकिंग, मोनार्क आणि डिलक्स या प्रोडक्ट्ससह लोकप्रिय झाला होता. यानंतर कंपनीनं १९९६ नंतर आपल्या बाईक्सचं प्रोडक्शन बंद केलं होतं.

Web Title: Yezdi Scrambler Adventure and Roadster motorcycles launched in India Prices start from Rs 1 98 lakh jawa yezdi motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app