रेट्रो-लुक असलेली Yamaha FZ-X भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 04:26 PM2021-06-18T16:26:52+5:302021-06-18T16:28:10+5:30

Yamaha FZ-X : ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. पाहा किती आहे किंमत.

Yamaha FZ X bike Launched In India Prices Begin at Rs 117 Lakh know details and specification | रेट्रो-लुक असलेली Yamaha FZ-X भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

रेट्रो-लुक असलेली Yamaha FZ-X भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Next
ठळक मुद्देYamaha FZ-X : ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.बाईकमध्ये देण्यात आले आहेत अनेक जबरदस्त फीचर्स

जपानची दुचाकी उत्पादक कंपनी यामाहानं भारतात आपली रेट्रो स्टाईल मोटरसायकल Yamaha FZ-X लाँच केली आहे. ही Yamaha FZ पेक्षा थोडी प्रीमिअम बाईक आहे. नव्या बाईकचं डिझाईन कंपनीच्या थोडं Yamaha XSR 155 प्रभावित असल्यासारखं दिसून येतं. तसंच ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीनं एक भारी ऑफर आणली असून 1 हजार रूपयांत ही बाईक बूक करता येणार आहे. 

1 हजारांत बुकिंग
कंपनीच्या डीलर्सनं FZ-X बाईकसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सुरुवातील ग्राहकांकडून 1 हजार ते 5 हजार रूपयांची बुकिंग अमाऊंट घेतली जात आहे. कंपनीनं 150 ते 200 सीसीच्या सेकमेंटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही बाईक 150cc मध्ये आणली आहे. यामध्ये कंपनी यापूर्वी  FZ, FZS आणि MT15 सारख्या बाईक्सची विक्री करत होती. FZ-X च्या स्टँडर्ड व्हर्जनची किंमत 1.17 लाख रूपये, तर अॅक्सेसरीज व्हर्जनची किंमत 1.20 लाख रूपये इतकी आहे. 

जबरदस्त इंजिन 
FZ-X रेट्रो स्टाईल बाईकमध्ये कंपनीनं 149 सीसीचं सिंगल सिलिंडर, एअर कुल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 7,250rpm वर 12bhp ची पॉवर आणि 5,500rpm वर 13.3Nm चं टॉर्क जेनरेट करतं. इंजिन 5 स्पीड गियरबॉक्ससोबत जोडलेलं आहे. यामध्ये सिंगच चॅनल एबीएस सिस्टमही देण्यात आलं आहे. 

जबरदस्त फीचर्स
Yamaha च्या या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी हेडलँप, डिजिटल इन्स्ट्रूमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, साईड स्टँड इंजिन किल स्विच, अपवेस्ट एक्झॉस्ट, फ्लॅट सीट, मोबाईल चार्जिंग सॉकेट, ब्लॉक पॅटर्न टायर, स्लीक एलईडी टेल लँप आणि Yamaha ConnectX सारखे मोबाईल फीचर्स दिले आहेत. ही बाईक मॅट ब्लू, मॅट ब्लॅक आणि मॅट कॉपर या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Web Title: Yamaha FZ X bike Launched In India Prices Begin at Rs 117 Lakh know details and specification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app