शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोमोबाईल मार्केट बुचकळ्यात! शाओमीची कार १८ महिन्यांत २.६५ लाख किमी चालली, तरीही बॅटरीची प्रकृती ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:14 IST

Xiaomi SU7 shocking Claim: शाओमीच्या इलेक्ट्रीक कारने Xiaomi SU7 बॅटरी बॅकअपबाबत नवा विक्रम केला आहे. १८ महिन्यांत २.६५ लाख किमी प्रवास करूनही बॅटरी ९४.५% हेल्दी आहे.

बीजिंग: स्मार्टफोन क्षेत्रात दबदबा निर्माण केल्यानंतर शाओमीने ऑटोमोबाईल क्षेत्रातही आपल्या 'Xiaomi SU7' इलेक्ट्रिक कारद्वारे खळबळ उडवून दिली आहे. एका ग्राहकाच्या वापरातील कारने केवळ १८ महिन्यांत तब्बल २ लाख ६५ हजार किलोमीटरचा टप्पा पार केला असून, विशेष म्हणजे इतक्या प्रचंड वापरानंतरही या कारच्या बॅटरीची प्रकृती ९४.५% इतकी शिल्लक असल्याचा दावा करण्यात आला आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

चीनमधील मिस्टर फेंग या शाओमी SU7 प्रो मालकाची ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांनी सरासरी दररोज ६०० किलोमीटर प्रवास केला आहे. बॅटरीची तपासणी केली असता, ९४.३ kWh क्षमतेच्या या बॅटरी पॅकमध्ये केवळ ५.५% घसारा झाला असल्याचे समोर आले. इलेक्ट्रीक वाहनांच्या टिकाऊपणाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना चीनमधून झालेल्या या दाव्यामुळे ऑटोमोबाईल मार्केट बुचकळ्यात पडले आहे. 

साधारणपणे ८ वर्षे किंवा १.५ लाख किलोमीटरनंतर बॅटरी २०-३०% खराब होण्याचा अंदाज असतो, मात्र शाओमीने हे खोटे ठरवले. पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत मिस्टर फेंग यांनी १८ महिन्यांत सुमारे १४,३०० डॉलर्स (अंदाजे १२ लाख रुपये) इंधनावर खर्च होणारे वाचवले आहेत. 

शाओमीचे सीईओ लेई जून यांनीही ही माहिती सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. मिस्टर फेंग आता पुढील ३ वर्षांत ६ लाख किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Xiaomi's Car Shocks Market: 265,000 km, Battery Still Strong!

Web Summary : Xiaomi's SU7 electric car stuns with a customer's vehicle achieving 265,000 km in 18 months, retaining 94.5% battery health. This challenges electric vehicle durability concerns, saving the owner significant fuel costs. Xiaomi CEO celebrates the achievement.
टॅग्स :xiaomiशाओमीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर