शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

World’s Smallest Car : जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 13:01 IST

World’s Smallest Car : ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे. 

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्र झपाट्याने वाढत आहे, छोट्या कार्ससोबतच हॅचबॅक आणि एसयूव्ही सेगमेंटमध्येही मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत कारची विक्रीही वाढली आहे. पण कार खरेदी करणार्‍यांचा एक वर्ग असा आहे की, जो शहरातील प्रवासासाठी छोट्या कारला प्राधान्य देतो. त्यामुळे टाटा नॅनो, बजाज क्यूट आणि पीएमव्ही ईएएस ई सारख्या कारचे उत्पादनही वेगाने होत आहे. 

अशा परिस्थितीत, जगातील सर्वात लहान कार कोणती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ती नॅनो किंवा बजाज क्यूट नाही. तर त्या कारचे नाव Peel P50 आहे.  या कारची लांबी फक्त 134 सेमी आहे. यामध्ये एकच व्यक्ती बसू शकतो. ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे. 

या कारची रुंदी 98 सेमी आणि उंची 100 सेमी आहे. मोटारसायकलच्या तुलनेत कारचे वजन खूपच कमी असते. कारचे वजन फक्त 59 किलो आहे. या कारच्या आकारामुळे 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात लहान कार म्हणूनही नोंद करण्यात आली होती.

मोपेड पेक्षा कमी पॉवरपील पी 50 मध्ये मोपेडपेक्षा लहान इंजिन दिले जाते. पण, ते त्यासह चांगले कार्य करते. पीलमध्ये 49 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन आहे, जे 4.2 बीएचपी पॉवर आणि 5 एनएम टॉर्क जनरेट करते. हे 3 स्पीड मॅन्युअल गियर बॉक्ससह येते. कारचा टॉप स्पीड सुमारे प्रति तास 61 किमी आहे. तर कारचे मायलेज प्रति लिटर 80 किमीपर्यंत आहे.

...म्हणून आहे हलकीकारची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तिचे वजन खूपच कमी आहे. कारची बॉडी मोनोकॉक फायबर ग्लासने बनलेली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे तर दोन पेडल्ससह कंट्रोलिंग व्हील, गियर शिफ्टर आणि स्पीडोमीटर शिवाय दुसरे कोणतेही फीचर नाही.

इलेक्ट्रिक व्हेरिएंटही लाँचपी 50 चे पहिल्यांदा उत्पादन 1965 मध्ये झाले होते. यानंतर, 2010 मध्ये, ते पुन्हा एकदा तयार केले गेले आणि बाजारात आणले गेले. आता P50 लंडनमध्ये तयार केले जाते. कंपनीने आता या कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंटही लाँच केले आहे. जर या कारच्या किंमतीबद्दल बोललो तर कारची किंमत जवळपास 84 लाख रुपये आहे. कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन E 50 युरोपियन मार्केटमध्ये खूप पसंत केले जाते.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगJara hatkeजरा हटकेelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार