शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:22 IST

world most valuable car mercedes benz 1955 model : ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ  (Mercedes-Benz) आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वात महागड्या कारची किंमत किती असू शकते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ऑडीपासून बीएमडब्ल्यू किंवा फेरारीपर्यंत, तुम्ही लक्झरीपेक्षा लक्झरी कारचा विचार करून पाहा. तुम्ही फक्त 2 कोटी किंवा 20 कोटींच्या कारचा विचार करू शकाल. पण आज आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत तुमच्या विचारापेक्षा अधिक आहे.

ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ  (Mercedes-Benz) आहे आणि तिची किंमत 14.3 कोटी डॉलर (1109 कोटी रुपये) आहे. अशा प्रकारे ही जगातील सर्वात महागडी कार आहे. या कारची लिलाव करणारी कंपनी आरएम सोथेबीचे (RM Sotheby) म्हणणे आहे की, मर्सिडीज बेंझच्या रेसिंग डिपार्टमेंटने अशा फक्त दोनच कार बनवल्या होत्या आणि तिच्या निर्मात्याच्या नावावरून रुडॉल्फ उहलेनहॉट (Rudolf Uhlenhaut) असे नाव दिले होते.

या कारचे नाव Mercedes-Benz 300 SLR Uhlenhaut Coupé आहे. या कारचे मॉडेल एका खासगी कलेक्टरने विकत घेतले आहे. विशेष प्रसंगी ही कार सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी कंपनीला दिले असले, तरी या कारचे दुसरे मॉडेल अद्याप मर्सिडीज-बेंझकडेच असेल आणि कंपनीच्या संग्रहालयाची शोभा वाढवत राहील.

फेरारीपेक्षा तीन पटीने महागएएफपीच्या वृत्तानुसार, ही कार RM Sotheby ने लिलावासाठी ठेवली होती. 5 मे रोजी जर्मनीतील मर्सिडीज-बेंझ कार संग्रहालयात जगातील काही क्लासिक कारचा लिलाव करण्यात आला होता. या मर्सिडीज कारची किंमत 1962 च्या  Ferrari 250 GTO पेक्षा जवळपास तिप्पट आहे, जी पूर्वी जगातील सर्वात महागडी कार होती. फेरारीचे हे 1962 मॉडेल 4.8  कोटी डॉलरमध्ये (सुमारे 372 कोटी रुपये)  विकण्यात आले होते. 

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झAutomobileवाहनcarकारbusinessव्यवसाय