EV खरेदीवर मिळणार १ लाख रुपयांचा इन्सेंटिव्ह? आता फक्त इतक्या रुपयांत मिळेल Comet अन् Tiago
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:54 IST2026-01-07T16:54:02+5:302026-01-07T16:54:39+5:30
new ev policy electric vehicles 1 lakh rupees incentive mg comet and tata tiago know details here

EV खरेदीवर मिळणार १ लाख रुपयांचा इन्सेंटिव्ह? आता फक्त इतक्या रुपयांत मिळेल Comet अन् Tiago
दिल्ली सरकार राजधानीतील नागरिकांसाठी एक नवे इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण आणण्याच्या तयारीत आहे. या EV धोरणात विविध प्रकारचे जबरदस्त प्रस्ताव देण्यात आले आहेत. हे धोरण आमलात आल्यास सरकारकडून लोकांना विविध प्रकारचे फायदे दिले जाऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन धोरण लागू झाल्यास २५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या खासगी इलेक्ट्रिक कारवर सवलत (इन्सेंटिव्ह) मिळू शकते. प्रस्तावात पहिल्या २७ हजार खासगी इलेक्ट्रिक कारसाठी प्रति kWh १० हजार रुपयांचे प्रोत्साहन अथवा इन्सेंटिव्ह देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत प्रति वाहन १ लाख रुपयांपर्यंत मर्यादित असेल.
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत होणार मोठी कपात -
या धोरणामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक कार खरेदीवर १ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तर टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) आणि एमजी कॉमेट ईव्ही (MG Comet EV) सारख्या स्वस्त कार खरेदी करणे अधिक सोपे होईल. सध्या टाटा टियागो ईव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख रुपये आहे. जर यावर १ लाख रुपयांचे इन्सेंटिव्ह मिळाला, तर तिची किंमत ६.९९ लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकेल. तर, एमजी कॉमेट ईव्हीची किंमत ७.५० लाख रुपयांपर्यंत खाली येईल.
...तर जुन्या कारसाठीही मिळेल सबसिडी -
महत्वाचे म्हणजे, जे लोक आपली जुनी पेट्रोल किंवा डिझेल कार स्क्रॅप करण्याऐवजी तिचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करू इच्छितात, त्यांनाही प्रोत्साहन देण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. या योजनेअंतर्गत, पहिल्या १,००० वाहनांच्या ईव्ही रूपांतरासाठी ५०,००० रुपयांपर्यंत सबसिडी देण्याचा प्रस्ताव आहे. खरे तर, राजधानीतील वाढते वायू प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.