सहा महिने थांबा...महिंद्राची आणखी एक इलेक्ट्रीक कार येतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 20:10 IST2018-11-15T20:10:13+5:302018-11-15T20:10:44+5:30
महिंद्राकडे देशातील पहिली विजेवर चालणारी कार असताना कंपनी आणखी एक इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारात आणणार आहे.

सहा महिने थांबा...महिंद्राची आणखी एक इलेक्ट्रीक कार येतेय...
नवी दिल्ली : महिंद्राकडे देशातील पहिली विजेवर चालणारी कार असताना कंपनी आणखी एक इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारात आणणार आहे. KUV100 ही पेट्रोल, डिझेलवर चालणारी कार पुढील वर्षात विजेवरही धावणार आहे. eKUV100 या नावाने ही कार ऑटो एक्स्पो 2018 मध्ये दाखविण्यात आली होती.
महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी सांगितले की, 2019 च्या मध्यावर ई-केयुव्ही लाँच केली जाईल. त्यानंतर S201 च्या इलेक्ट्रीक कारला 2020 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीत लाँच केले जाईल. यंदा झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ई-केयुव्ही 100 ला महिंद्रा ई-व्हेरिटोचे 30kW (41hp) ची मोटर आणि लिथियम आयन बॅटरी देण्यात आली होती. लाँचिंगवेळी अपडेट केलेली मोटर आणि बॅटरी पॅक दिली जाऊ शकते.
ही इलेक्ट्रीक कार 140 किमीचे अंतर कापेल. तसेच फास्ट चार्जिंगचा पर्यायही मिळणार आहे. एका तासात 80 टक्के बॅटरी चार्ज होईल. याचबरोबर स्मार्टफोन कनेक्टीव्हिटी, रिमोट डायग्नोस्टिक, केबिन प्री-कुलिंग, लोकेशन ट्रॅकिंग सारखे फिचर्स देण्यात येतील. याशिवाय ही कार वाहन चालविण्याची सवय आणि बॅटरी स्टेटसही लक्षात ठेवणार आहे.