जरा थांबा...! भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या कार पुन्हा येतायत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 17:13 IST2018-11-19T17:12:53+5:302018-11-19T17:13:15+5:30
साधारण शंभर वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या कारना बरेच वाहनप्रेमी काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपत आहेत.

जरा थांबा...! भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या कार पुन्हा येतायत...
नवी दिल्ली : साधारण शंभर वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या कारना बरेच वाहनप्रेमी काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपत आहेत. या कारना व्हिंटेज कारही म्हणतात. या कारचा मोठ्या शहरांमध्ये मेळावाही भरतो. या व्हिंटेज कारच्या देखभालीसाठी खर्चही तेवढाच येत असतो. आता यापैकी काही कार पुन्हा भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. त्या ही अद्ययावत रुपात.
या कार जुन्याच म्हणजे व्हिंटेज रुपात असणार असून इंजिनापासून आतील सर्व तंत्रज्ञान आजच्या जगातील असणार आहे. म्हणजे मूळ कंपन्याच या कारना मॉडिफाय करून त्यांचे फेसलिफ्ट बाजारात आणणार आहेत. अशा तीन लोकप्रिय कार येत आहेत.
हिंदुस्तान मोटर्सच्या Ambassador कारने भारतात तेव्हा धुरळा उडविला होता. मात्र, कालांतराने नवीन कार येत गेल्या आणि ही कार केवळ सरकारी कामासाठीच वापरात राहीली. मागणी कमी झाल्याने कंपनीला या कारचे उत्पादन बंद करावे लागले. आता ही कार नव्या अवतारात घएऊन Peugeot ही फ्रेंच कार निर्माता कंपनी येत आहे. लूक तोच मात्र तंत्रज्ञान नवे असे या कारचे सौंदर्य पुन्हा भारतीयांचे प्रेम खेचून घेणार आहे.
मारुती सुझुकीची सर्वात पहिली कार SS80 नेही तेव्हा श्रीमंतीचा दाखला दिला होता. 1983 मध्ये लाँच झालेल्या कारने अनेकांची मने जिंकली होती. एका चांगल्या इंजिनासह 4 जणांना बसण्याची जागा होती. या कारच्या नव्या अवतारातटायरचे रिम्स आणि रबर जास्त रुंद देण्यात आला आहे. तसेच ग्रीलला BMW च्या एम डिव्हीजनचा आयकॉनिक रंग देण्यात आला आहे. इंडिकेटरही स्पोर्टी लूकवाले आहेत.
अँम्बॅसिडर कारला तेव्हा कोण प्रतिस्पर्धी होती ती म्हणजे फियाटची प्रिमिअर पद्मीनी. Premier Padmini ही कार पैसा वसूल होती. नव्या अवतारात क्रोमसोबत ब्लॅक ट्रीटमेंट देण्यात आली आहे. तसेच फियाटचा लोगोही आकर्षक पद्धतीने दिला आहे. तसेच नव्या हेडलाईटसह बंपरवरही लाईट देण्यात आले आहेत.