VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:23 IST2025-09-25T16:21:18+5:302025-09-25T16:23:09+5:30
VLF Mobster Launched in India: व्हीएलएफने भारतात त्यांची पहिली आयसीई परफॉर्मन्स स्कूटर, व्हीएलएफ मॉबस्टर लॉन्च केली.

VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
व्हीएलएफने भारतात त्यांची पहिली आयसीई परफॉर्मन्स स्कूटर, व्हीएलएफ मॉबस्टर लॉन्च केली, ज्याची सुरुवातीची किंमत १.३० लाख (एक्स-शोरूम) आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस इग्निशन आणि ऑटो स्टार्ट/स्टॉपसह ५-इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर थेट एप्रिलिया एसआर १७५ आणि टीव्हीएस एनटॉर्क १५० सारख्या प्रीमियम स्कूटरशी स्पर्धा करेल.
या स्कूटरचे डिझाइन स्ट्रीटफायटर बाईक्सपासून प्रेरित आहे, ज्यामुळे ती तरुणांना आकर्षित करेल. यात समोर ट्विन एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल देण्यात आले आहेत. डिझाइनमध्ये उंच फ्लायस्क्रीन आणि एक्सपोज्ड हँडलबार दिसतात. कॉम्पॅक्ट लूक असूनही, यात स्पोर्टी सीट डिझाइन आहे. स्कूटर १२-इंच अलॉय व्हील्स सह येते; पुढे १२०-सेक्शन टायर्स आणि मागील बाजूस १३०-सेक्शन टायर्स आहेत. ही स्कूटर लाल आणि राखाडी अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आली. ही स्कूटर १२ बीएचपी आणि ११.८ एनएम जनरेट करतो. तसेच स्कूटरमध्ये ५-इंचाचा टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि कीलेस इग्निशन, ऑटो स्टार्ट/स्टॉप, ऑल-एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे.
कोणाशी स्पर्धा?
व्हीएलएफ मॉबस्टर थेट बाजारात उपलब्ध असलेल्या एप्रिलिया एसआर १७५ आणि टीव्हीएस एनटॉर्क १५० सारख्या प्रीमियम परफॉर्मन्स स्कूटरशी स्पर्धा करेल. दमदार इंजिन आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्समुळे ही स्कूटर निश्चितच या सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मॉबस्टर ही स्विचेबल ड्युअल-चॅनेल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल असलेली तिच्या श्रेणीतील (१२५ सीसी) पहिली स्कूटर आहे.