Video: पोलिसांनी हेल्मेट न घातल्याचे चलन फाडले; तरुणाने बाईकच फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 19:58 IST2019-12-03T19:58:04+5:302019-12-03T19:58:10+5:30
मेरठमध्ये एका तरुणाला हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी अडविले.

Video: पोलिसांनी हेल्मेट न घातल्याचे चलन फाडले; तरुणाने बाईकच फोडली
मेरठ : नवीन मोटार वाहन कायदा आल्याने दंडाची रक्कम 10 पटींनी वाढली आहे. यामुळे वाहनचालकही आता घाबरून नियम पाळू लागले आहेत. मात्र, मेरठमध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे.
मेरठमध्ये एका तरुणाला हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी अडविले. तसेच त्याच्यावर दंडही आकारण्यात आला. याचा राग त्या तरुणाने पोलिसांच्याच समोर भर रस्त्यामध्ये काढला. ही घटना कुठे झाली याचे ठिकाण समजू शकलेले नाही. एका व्यक्तीने हा व्हिडीओ उत्तर प्रदेश पोलिसांना ट्विट केल्याने हा प्रकार समोर आला आहे.
या तरुणाने रागातून त्याची बाईकच रस्त्यावर अनेकदा पाडली. त्यानंतर लोकांनी व्हिडीओ बनवायला सुरूवात केली. बाईक दोन्ही बाजुने आपटून झाल्यानंतर तो युवक पडलेल्या बाईकवर बसला आणि रडू लागला.
Agitated over traffic challan, a biker in UP's Meerut took out his anger on his motorcycle. He later sat on the fallen bike and started crying as traffic cops stood and watched the entire drama unfolding on a busy street in the city. @Uppolicepic.twitter.com/lZ8TfQYUWt
— Piyush Rai (@Benarasiyaa) November 25, 2019
विना हेल्मेट मोटारसायकल चालविताना युवकाला थांबविण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ पोलिसही काढत होते. मात्र, त्यांनी त्या तरुणाला असे कृत्य करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर पोलिसांनी त्या तरुणाला समजाविण्याचा प्रयत्न केला.