शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:00 PM

Which car does Nitin Gadkari use?: वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर महाराष्ट्राचे लाडके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या पर्यायांचा रेटा लावला आहे. परंतू, स्वत: कोणती कार वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर महाराष्ट्राचे लाडके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रीक, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या पर्यायांचा रेटा लावला आहे. परंतू, स्वत: कोणती कार वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान...य़ा उक्तीप्रमाणे तर नाही ना...! तसे नाहीय. गडकरींनी जनतेला सांगण्याआधी स्वत:पासून सुरुवात केली आहे. (Union Minister Nitin Gadkari has ditched his official bulletproof Toyota Fortuner for a MG ZS EV in Nagpur, Maharashtra.)

महत्वाचे केंद्रीय मंत्रिपद आणि भाजपाच्या वरिष्ठ नेते पदाचे वलय असल्याने नितीन गडकरींना टोयोटा कंपनीची बुलेटप्रूफ फॉर्च्युनर कार देण्यात आली होती. मोठे मंत्री असल्याने त्यांची सुरक्षाही तेवढीच महत्वाची आहे. ही कार डिझेलवर चालणारी होती. परंतू गडकरींनी ही कार राज्य सरकारला परत केली आहे. भारतात सध्या टाटाच्या दोन, ह्युंदाईची एक आणि एमजी मोटर्सची एक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशा इलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी गडकरींनी त्यांच्या शहरात नागपूरमध्ये एमजी मोटर्सच्या झेडएस ईव्हीला (MG ZS EV) पसंती दिली आहे. गडकरी नागपूरमध्ये याच कारमधून फिरतात. ही कार गडकरींच्या ताफ्यात फेब्रुवारीतच दाखल झाली आहे. 

Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या...

यावर गडकरींनी सांगितले की, मी स्वच्छ वाहतूकीचा पुरस्कर्ता आहे. यामुळे मी आता इलेक्ट्रीक कार वापरतो. यामुळे प्रदूषण कमी होते. आता ही कार गडकरींनी स्वत: खरेदी केलीय की त्यांच्यासाठी ESSL ने घेतलीय हे स्पष्ट झालेले नाहीय. परंतू गडकरींनी नागपूरमध्ये ईलेक्ट्रीक कारना प्रोत्साहन मिळेल आणि स्वच्छ हवेचे शहर बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...

ईलेक्ट्रिक वाहने ही भविष्यातील वाहने

वाहन क्षेत्रातील सध्याच्या प्रगतीच्या मार्गानुसार, ईव्हीमध्ये एक तर्कशुद्ध बाब आहे. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या  वाहनांना बाजूला सारण्याचे वाढते प्रमाण, यातच या ट्रेंडचे भवितव्य दिसून येते. तांत्रिक प्रगतीमुळे अपारंपरिक, शाश्वत ऊर्जा स्रोत हे अधिक व्यवहार्य आणि किंमतीनुसार प्रभावी असून वाहन उद्योग वेगाने नावीन्यपूर्ण वीज निर्मिती पर्याय स्वीकारत आहे. परिणामी, इलेक्ट्रिक आधारीत वाहने ही सर्वसामान्य बनत असून, इंटर्नल कम्बस्शचन इंजिन्स (आयसीई) हे या चक्रात मागे पडत आहेत.

Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMG Motersएमजी मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कारPetrolपेट्रोलDieselडिझेल