शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

आता फक्त RTO चं नाही तर NGO सह 'या' कंपन्या सुद्धा बनवणार ड्रायव्हिंग लायसन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 20:29 IST

driving license : आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी (Learning License) परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही. मात्र, वाहनांच्या नोंदणीसाठी (RC), तुम्हाला आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागेल.

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याबाबत (Driving license) केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता कार कंपन्या (Car Manufacturers), ऑटोमोबाईल असोसिएशन (Automobile Associations) आणि स्वयंसेवी संस्थांनाही (NGO) ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रे उघडण्याची परवानगी दिली जाईल. या संस्था त्यांच्या केंद्रांमध्ये प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यास सक्षम असतील. (transport ministry big announcement now these companies and ngo will issue driving license rto)

आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी (Learning License) परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही. मात्र, वाहनांच्या नोंदणीसाठी (RC), तुम्हाला आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या संदर्भात नोटीस जारी केली आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्वीप्रमाणेच ड्रायव्हिंग लायसन्स जारी करत राहील.

ड्रायव्हिंग लायसन्सवरून केंद्राचा मोठा निर्णयरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार, आता कार निर्मिती कंपन्या, ऑटो मोबाईल असोसिएशन आणि स्वयंसेवी संस्थांनाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रशिक्षण शाळा उघडण्याची परवानगी दिली जाईल. आता या कंपन्या ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झालेल्यांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतील.

या सेवांसाठी वेळोवेळी सूचना केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याच्याशी संबंधित अनेक सेवांबाबत वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करत राहते. विशेषतः अलीकडच्या काळात, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली-एनसीआर आणि झारखंड यासारख्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांनी लर्निंग लायसन्स आणि वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. तसेच, काही राज्यांमध्ये आता फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.

कोरोना काळात आरटीओसंबंधी अनेक निर्णयकोरोनाच्या काळानंतर देशातील जवळजवळ सर्व राज्यांच्या परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याची पद्धत बदलली आहे. आता नवीन व्यवस्थेअंतर्गत, स्लॉट बुक करताच लर्निंग लायसन्ससाठी पैसे जमा करावे लागतील. तुम्ही पैसे जमा करताच तुमच्या सोयीनुसार परीक्षेची तारीखही उपलब्ध आहे.

लायसन्स संबंधित सेवांसाठी परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जावे आणि ड्रायव्हिंग लायसन्स सेवांवर क्लिक करावे. फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांकासह अधिक वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित अधिक महत्वाची कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करावी लागतील. आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक तपशील तपासल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण केले जाईल.

टॅग्स :AutomobileवाहनRto officeआरटीओ ऑफीसIndiaभारत