वाहनचालकांनो चुकूनही करू नका अशी चूक; ...तर कापलं जाईल 20000 रुपयांचं चलान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:02 IST2022-04-05T18:01:39+5:302022-04-05T18:02:46+5:30
नुकताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत काही युवकांचा गाडीच्या छतावर उभे राहून नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एकूण 20,000 रुपयांचे चलान कापून 5 तरुणांना अटक केली आहे.

वाहनचालकांनो चुकूनही करू नका अशी चूक; ...तर कापलं जाईल 20000 रुपयांचं चलान!
वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आपले 20000 रुपयांचे ट्रॅफिक चलानही कापले जाऊ शकते. अशी कारवाई पोलिसांकडून नुकतीच करण्यात आली आहे. जर आपण आपले वाहन चालवत असाल, तर वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
नुकताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत काही युवकांचा गाडीच्या छतावर उभे राहून नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत गाझियाबाद पोलिसांनी एकूण 20,000 रुपयांचे चलान कापून 5 तरुणांना अटकही केली आहे. स्वतः गाझियाबाद पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अशात आपल्यालाही, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे.
चलान कापलं गेलं की नाही, असं करा चेक -
https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. आपल्याला चलान क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. यांपैकी वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. आता चलान स्टेटस दिसेल.
अशा पद्धतीनं ऑनलाइन भरा ट्रॅफिक चलान -
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चलानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा आणि गेट डिटेलवर क्लिक करा. यानंतर, एक नवे पेज आपल्यासमोर येईल, यावर चलानशी संबंधित माहिती असेल. तुम्हाला भरायचे असलेले चलन शोधा. चलनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटच कंफर्म करा. आता आपले ऑनलाइन चलान भरले गेले आहे.