मुंबई: भारतीय वाहन क्षेत्रात टोयोटाने आज आपल्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV चे, 'अर्बन क्रूझर इबेला' चे अनावरण करून ईव्ही मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. केवळ कार लाँच न करता, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि ६० टक्के अशुअर्ड बायबॅक सारख्या आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स:बॅटरी आणि रेंज: या SUV मध्ये ६१ किलोवॅटचा (61 kWh) दमदार बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर ५४३ किमी पर्यंतची रेंज देईल.
डिझाइन: टोयोटाच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये त्रिकोणी LED हेडलाइट्स, हैमरहेड डिझाइन आणि विशेष ग्रिल देण्यात आली आहे. १८ इंची एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स कारला स्पोर्टी लूक देतात.
स्पेस आणि व्हीलबेस: २७०० एमएमचा लांब व्हीलबेस असल्यामुळे गाडीच्या केबिनमध्ये मोठी जागा (Legroom) उपलब्ध आहे.
आत काय आहे खास? इंटेरियर: १०.२५-इंच मोठी टचस्क्रीन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ३६०-डिग्री कॅमेरा.
लक्झरी फीचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रिक्लाईन आणि स्लाईड होणाऱ्या रिअर सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि प्रिमियम JBL स्पीकर्स.
सुरक्षा: हाय टेन्साईल बॉडी, ६ ते ८ एअरबॅग्स, ट्युनड सस्पेंशन आणि प्रगत ADAS सुरक्षा प्रणाली.
ग्राहकांसाठी खास ऑफर:टोयोटाने ईव्ही खरेदीदारांमधील भीती दूर करण्यासाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत:
१. वॉरंटी: बॅटरीवर तब्बल ८ वर्षांची वॉरंटी.
२. बायबॅक: ठराविक काळानंतर कार परत घेतल्यास ६०% अशुअर्ड बायबॅक व्हॅल्यू देण्याचे आश्वासन.
३. सर्व्हिस: ५०० सर्व्हिस चेकपॉईंट आणि २५०० प्रशिक्षित टेक्निशिअन्सचे जाळे.
Web Summary : Toyota launched its first electric SUV, the Ebella, in India. It boasts a 543km range, 8-year battery warranty and 60% buyback. Features include a 10.25-inch touchscreen, ADAS, and panoramic sunroof. Toyota offers extensive service network.
Web Summary : टोयोटा ने भारत में अपनी पहली इलेक्ट्रिक एसयूवी, एबेला लॉन्च की। इसमें 543 किमी की रेंज, 8 साल की बैटरी वारंटी और 60% बायबैक है। इसमें 10.25 इंच का टचस्क्रीन, एडीएएस और पैनोरमिक सनरूफ शामिल हैं। टोयोटा व्यापक सेवा नेटवर्क प्रदान करता है।