टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:04 PM2020-05-20T13:04:21+5:302020-05-20T13:09:06+5:30

टोयोटाने नवीन एसयुव्ही Venza वरून पडदा हटविला आहे. यामध्ये हॅरिअरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला असून आतील डिझाईन आणि इंटेरिअरदेखील हॅरिअरसारखेच आहे.

Toyota unevils SUV Venza for world; launching Indian market unknown hrb | टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार

टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार

Next
ठळक मुद्देआता हॅरिअर म्हटले की तुम्ही टाटाकडे वळाल. पण तसे नाहीय. इंजिनमध्ये सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. एसयुव्हीमध्ये NORMAL, ECO आणि SPORT असे तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.टोयोटाची ही नवीन एसयुव्ही ही लक्झरियस आरामदायीपणा देणारी आहे.

नवी दिल्ली : इनोव्हाद्वारे भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱी जपानची Toyota  कंपनी एसयुव्ही सेंगमेंटमध्ये धुमाकूळ घालणार आहे. टोयोटाने नवीन एसयुव्ही Venza वरून पडदा हटविला आहे. यामध्ये हॅरिअरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला असून आतील डिझाईन आणि इंटेरिअरदेखील हॅरिअरसारखेच आहे. वेंन्झामध्ये हायब्रिड पावरट्रेन देण्यात आले आहे. 


आता हॅरिअर म्हटले की तुम्ही टाटाकडे वळाल. पण तसे नाहीय. टोयोटाने नुकतीच जपानमध्ये हॅरिअर नावाची एसयुव्ही लाँच केली आहे. ही ती हॅरिअर आहे. वेन्झामध्ये ३ इलेक्ट्रिक मोटर असून २.५ लीटरचे ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या हायब्रिड पेट्रोल इंजिनची एकत्रित ताकद ही २१९ बीएचपी आहे. इंजिनमध्ये सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. एसयुव्हीमध्ये NORMAL, ECO आणि SPORT असे तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.


टोयोटाची ही नवीन एसयुव्ही ही लक्झरियस आरामदायीपणा देणारी आहे. यामध्ये 12.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 9 JBL स्पीकर, 7-इंच MID, डिजिटल रियर व्यू मिरर आणि १० इंचाचा कलर हेड अप डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय़ वेन्झामध्ये पॅनारोमिक ग्लास रुफ आणि हिटेड व्हेंटिलेटेड फ्रंट सीट देण्यात आली आहेत. 


वेन्झामध्ये सेफ्टी फिचर्सवरही लक्ष देण्यात आले आहे. डे टाईम, लो लाईट व्हेईकल आणि पादचारी असल्यास सूचना देणे, आदळण्याआधी कार्यन्वित होणारी यंत्रणा, प्लस डेटाइम बाइसाइकल डिटेक्शन, फुल-स्पीड रेंज डायनॅमिक रडार क्रूज कंट्रोल, स्टिअरिंग असिस्टसोबत लेन डिपार्चर अलर्ट, अॅटोमॅटीक हाय बीम्स, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि रोड साईन असिस्ट सारखे फिचर उपलब्ध आहेत. 

ही कार भारतीय बाजारात उतरविण्याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरीही अमेरिकेमध्ये या वर्षाच्या शेवटी ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची किंमत ३५ हजार डॉलर म्हणजे २६.५० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ही कार Ford Edge, Honda Passport आणि Hyundai Santa Fe या कारना टक्कर देणार आहे. भारतीय बाजारात टोयोटा मारुतीच्या ब्रेझावर आधारित नवीन एसयुव्ही अर्बन क्रुझर आणण्याची तयारी करत आहे. ही कार ऑगस्टमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कोरोना संकटात पीएफ काढताय? रिजेक्ट न होण्यासाठी या पाच चुका टाळा

CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय

तुम्ही कोणत्या झोनमध्ये? राज्यात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट

मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

Web Title: Toyota unevils SUV Venza for world; launching Indian market unknown hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app