भारतीय बाजारात धमाका करण्याच्या तयारीत टोयोटा! नवीन फॉर्च्युनरसह ४ दमदार SUV लाँच करणार; पाहा संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:41 IST2026-03-30T13:40:52+5:302026-03-30T13:41:20+5:30
कंपनी आपल्या भारतातील पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. टोयोटा भारतीय बाजारात अनेक नवीन कार आणि एसयूव्ही लॉन्च करणार आहे. यांत नवीन फॉर्च्युनर, अर्बन क्रूझर एबेला आणि नवीन हायलक्स, यांचा समावेश आहे.

भारतीय बाजारात धमाका करण्याच्या तयारीत टोयोटा! नवीन फॉर्च्युनरसह ४ दमदार SUV लाँच करणार; पाहा संपूर्ण लिस्ट
जगभरात विश्वासार्ह वाहनांसाठी प्रसिद्ध असलेली टोयोटा कंपनी आता भारतीय बाजारपेठेत नवा धमाका करण्याच्या तयारीत आहे. जर आपणही टोयोटाचे चाहते असाल आणि नवीन कार घेण्याच्या विचारात असाल, तर काही महिने थांबा. कंपनी आपल्या भारतातील पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. टोयोटा भारतीय बाजारात अनेक नवीन कार आणि एसयूव्ही लॉन्च करणार आहे. यांत नवीन फॉर्च्युनर, अर्बन क्रूझर एबेला आणि नवीन हायलक्स, यांचा समावेश आहे.
नवीन जनरेशन फॉर्च्युनर आणि इबेला -
बहुप्रतीक्षित 'न्यू-जेन. फॉर्च्युनर'ची टेस्टिंग सुरू झाली असून, ही एसयूव्ही २०२६ अखेर अथवा २०२७ च्या सुरुवातीला लाँच होऊ शकते. या कारमध्ये १२.३ इंचाचे टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर आणि पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यांसारखे हायटेक फीचर्स असतील. याशिवाय, 'अर्बन क्रूझर इबेला' ही पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढच्या महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ६१ kWh बॅटरी पर्यायासह ही गाडी एका चार्जवर ५४३ किमीची रेंज देईल. या पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्हीमधील सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये लेव्हल २ एडीएएस सूट, ३६०-डिग्री कॅमेरा आणि सात एअरबॅग्जचा समावेश आहे.
न्यू-जेन. हायलक्स आणि हायराइडर -
नोव्हेंबर २०२५ मध्ये जागतिक स्तरावर लाँच झालेली नवीन 'हायलक्स' आता भारतीय रस्त्यांवर उतरण्यासाठी सज्ज आहे. ही ICE आणि EV अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. काही बाजारांमध्ये हिच्या ऑल-इलेक्ट्रिक मॉडलची विक्री आधीच सुरू झाली आहे. तर ICE इंजिनच्या व्हर्जनची डिलिव्हरी 2026 च्या मिडमध्ये सुरू होईल. इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये २४० किमीची रेंज मिळेल.
टोयोटाची लोकप्रिय 'हायराइडर' आता ७-सीटरमध्ये?
यासोबतच, टोयोटाची लोकप्रिय 'हायराइडर' आता ७-सीटरमध्येही येऊ शकते. नवीन डिझाइन आणि १७ इंचाच्या अलॉय व्हील्ससह ही ७-सीटर एसयूव्ही सप्टेंबर २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच होणे अपेक्षित आहे. यामध्ये १.५ लीटर हायब्रीड पेट्रोल इंजिन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टीमचा पर्यायही दिला जाऊ शकतो.