Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:20 IST2026-01-14T17:19:20+5:302026-01-14T17:20:12+5:30
Top 5 Most Affordable Cars in India: मध्यमवर्गीय कुटुंबासाठी स्वतःची कार असणं हे केवळ स्वप्न नसून गरज आहे. पण बजेटमुळे अनेकदा आपण विचार सोडून देतो. मात्र, आता कार कंपन्यांनी किमतीत मोठी कपात केल्यामुळे अनेक गाड्या तुमच्या बजेटमध्ये आल्या आहेत!

Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
स्वतःची हक्काची कार असावी, असे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे असते. पण वाढत्या किमती आणि मर्यादित पगारामुळे अनेकदा हे स्वप्न लांबणीवर पडते. मात्र, आता कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. जीएसटी आणि किमतीतील कपातीनंतर अनेक लोकप्रिय कार आता बजेटमध्ये आल्या आहेत.
मारुती एस-प्रेसो
मारुती एस-प्रेसो सध्या भारतातील सर्वात स्वस्त कार ठरली आहे. जीएसटीआधी या कारच्या ओ व्हेरिएंटची किंमत ४ लाख २६ हजार इतकी होती. मात्र, आता ही कार ३ लाख ४९ हजारांत उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांची ७६ हजार ६०० रुपयांची बचत होणार आहे. सुमारे १८ टक्के किंमत कपात झाल्याने ही कार बजेट सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणीची बनली आहे.
मारुती अल्टो के १०
पूर्वी देशातील सर्वात स्वस्त कार असलेली मारुती अल्टो के १० आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसटीडी ओ व्हेरिएंटची किंमत ४ लाख २३ हजारांवरून ३ लाख ६९ लाखांपर्यंत कमी झाली आहे. परवडणारी किंमत आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे अल्टो के १० अजूनही लोकप्रिय आहे.
रेनॉल्ट क्विड
रेनॉल्ट क्विड ही आता तिसरी सर्वात स्वस्त कार आहे. १.० आरएक्सई व्हेरिएंटची किंमत ४ लाख ६९ हजार इतकी होती, आता ४ लाख २९ हजारांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे ग्राहकांना ४० हजारांची सूट मिळत आहे. एसयूव्ही कारसारखी डिझाइन आणि बजेट फ्रेंडली किंमतीमुळे ही कार ग्राहकांना आकर्षित करत आहे.
टाटा टियागो
टाटा टियागो चौथ्या क्रमांकावर आहे. तिच्या एक्सईर प्रकाराची किंमत जीएसजीआधी ४ लाख ९९ हजार होती. मात्र, आता या कारची किंमत ४ लाख ५७ हजारांपासून सुरू होते. आधीच्या आणि आताच्या किंमतीत ४२ हजार ५०० रुपयांचा फरक आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी आणि स्टायलिश डिझाइनमुळे या किमतीत टियागो एक उत्तम पर्याय मानली जाते.
मारुती सेलेरियो
मारुती सेलेरियोही परवडणाऱ्या कार्समध्ये महत्त्वाचा पर्याय आहे. एक्सआय या व्हेरिएंटची किंमत ५ लाख ६४ हजारांवरून ४ लाख ६९ हजारापर्यंत कमी झाली आहे. यामुळे ग्राहकांची सुमारे ९४ हजार १०० ची बचत होत असून सुमारे १७ टक्के किंमत कपात झाली आहे, ज्यामुळे सेलेरियो अधिकच आकर्षक बनली आहे.