या Tesla कारनं वाचवला भारतीयाचा जीव, आली इलॉन मस्क यांची रिएक्शन; जाणून घ्या खासियत अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:50 IST2026-02-23T17:47:39+5:302026-02-23T17:50:01+5:30

ठरली जगातील सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार ठरली आहे...

This Tesla car saved the life of an Indian, here is Elon Musk's reaction; Know about tesla model y features and price | या Tesla कारनं वाचवला भारतीयाचा जीव, आली इलॉन मस्क यांची रिएक्शन; जाणून घ्या खासियत अन् किंमत

या Tesla कारनं वाचवला भारतीयाचा जीव, आली इलॉन मस्क यांची रिएक्शन; जाणून घ्या खासियत अन् किंमत

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. 'टेस्ला मॉडेल वाय' (Tesla Model Y) ही जगातील सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार म्हणून समोर आली आहे. अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली ही कार आता भारतातही खरेदी करता येणार आहे. टेस्ला ही प्रगत तंत्रज्ञान, अधिक रेंज आणि प्रीमियम डिझाइनसाठी ओलखली जाते. दरम्यान, टेस्लाच्या 'ऑटोपायलट' तंत्रज्ञानामुळे नुकतेच एका भारतीयाचे प्राण वाचवल्याची घटनाही समोर आली आहे. यावर खुद्द इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टेस्लानं वाचवला भारतीय नागरिकाचा जीव - 
नुकतेच सोशल मीडियावर एक वृत्त व्हायरल झाले. यात, टेस्लाच्या 'ऑटोपायलट/फुल-सेल्फ-ड्राइव्हिंग' तंत्रज्ञानामुळे एका भारतीय वंशाच्या चालकाचा जीव वाचला. ऋषी व्होरा असे संबंधित व्यक्तीचे नाव. व्होरा हे कार चालवत असताना 'अॅलर्जिक रिअॅक्शन'मुळे अचानक बेशुद्ध झाले. अशा परिस्थितीत कारमधील 'ड्राइव्हर-मॉनिटरिंग सिस्टिम'ने त्यांची हालचाल थांबल्याचे ओळखून तत्काळ गाडीचा वेग कमी केला, आपत्कालीन दिवे (हॅझर्ड लाईट्स) सुरू केले आणि कार सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली. यामुळे एक मोठा अपघात टळला. यानंतर, व्होरा यांच्या पत्नीने लोकेशन ॲपच्या मदतीने आपत्कालीन यंत्रणांना कळवले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांनी "आपण ठीक, आहात, याचा आनंद आहे (Glad you’re ok)," असे म्हटले आहे.

Tesla Model Y चे फीचर्स -
टेस्ला मॉडेल वायला अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यांत, १५.४-इंचाचा मोठा टचस्क्रीन, त्यात हिटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, नऊ स्पीकरचे साऊंड सिस्टिम आणि टिंटेड ग्लास रूफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक आणि ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग यांसारखी स्मार्ट फीचर्स मिळतात.

Tesla Model Y ची रेंज आणि किंमत -
ही कार दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही कार ५०० किलोमीटर आणि 'लॉन्ग रेंज' व्हेरिअंटमध्ये ६६१ किलोमीटरपर्यंत धावू शकते. भारतात याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५९.८९ लाख रुपये असून, लॉन्ग रेंज मॉडेलची किंमत ६७.८९ लाख रुपयांपर्यंत जाते.
 

Web Title : टेस्ला के ऑटोपायलट ने बचाई भारतीय ड्राइवर की जान; एलन मस्क की प्रतिक्रिया

Web Summary : टेस्ला के ऑटोपायलट ने एक भारतीय ड्राइवर को बेहोश होने पर बचाया। एलन मस्क ने प्रतिक्रिया दी। मॉडल Y में आधुनिक तकनीक, लंबी रेंज और सुरक्षा सुविधाएँ हैं। कीमत ₹59.89 लाख से शुरू।

Web Title : Tesla's Autopilot Saves Indian Driver; Elon Musk Reacts

Web Summary : Tesla's Autopilot saved an Indian driver who fell unconscious. Elon Musk responded. The Model Y features advanced tech, long range, and safety features. Price starts at ₹59.89 lakh.