या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:11 IST2025-09-30T10:11:01+5:302025-09-30T10:11:42+5:30
Citroen C3 Aircross BNCAP Safety Rating: 5-स्टार रेटिंगसह ठरली देशातील सुरक्षित SUV, पाहा क्रॅश टेस्टचा निकाल

या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
भारतातील कार सुरक्षा मानकांमध्ये वाढ होत असून, अनेक कंपन्या आपल्या गाड्यांना भारत NCAP (Bharat NCAP) द्वारे टेस्ट करून घेत आहेत. फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने आपली C3 Aircross ची क्रॅश टेस्ट केली असून, या गाडीने सुरक्षिततेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. Bharat NCAP ने या SUV ला 5-स्टार रेटिंग दिले आहे, ज्यामुळे ही गाडी भारतातील सर्वात सुरक्षित गाड्यांच्या यादीत सामील झाली आहे.
Citroen C3 Aircross ने प्रौढांच्या सुरक्षेच्या (Adult Occupant Protection) बाबतीत जबरदस्त कामगिरी करत 5-स्टार रेटिंग मिळवली आहे. या एसयूव्हीला एकूण ३२ पैकी २७.०५ गुण मिळाले आहेत. तर फ्रंटल ऑफसेट बॅरियर टेस्ट: यामध्ये गाडीला ११.०५ गुण मिळाले. साइड मुव्हेबल बॅरियर टेस्ट: यामध्ये गाडीने १६ गुण मिळाले आहेत. प्रौढांच्या सुरक्षेसाठी या कारला फाईव्ह स्टार मिळाले आहेत.
मुलांच्या सुरक्षेतही प्रभावी
लहान मुलांच्या सुरक्षेच्या (Child Occupant Protection) बाबतीतही Citroen C3 Aircross ने चांगली कामगिरी केली आहे. या श्रेणीत गाडीला 4-स्टार रेटिंग मिळाली आहे. एकूण ४९ गुणांपैकी गाडीने ४० गुण मिळवले आहेत. डायनॅमिक स्कोअर: २४ गुण, CRS इन्स्टॉलेशन स्कोअर: १२ गुण, व्हेईकल असेसमेंट स्कोअर: ४ गुण मिळाल्याने मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी ही एक सुरक्षित एसयूव्ही ठरते.