लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी Tesla ची RoboTaxi वादात; सरकारी एजंसीने सुरू चौकशी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:24 IST2025-06-24T17:24:07+5:302025-06-24T17:24:51+5:30

Tesla Robotaxi: इलॉन मस्क यांची महत्वकांशी रोबोटॅक्सी सेवा काल लॉन्च करण्यात आली.

Tesla's RoboTaxi in controversy on the second day of launch; Government agency starts investigation, why? | लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी Tesla ची RoboTaxi वादात; सरकारी एजंसीने सुरू चौकशी, कारण...

लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी Tesla ची RoboTaxi वादात; सरकारी एजंसीने सुरू चौकशी, कारण...

Tesla RoboTaxi Incident: गेल्या अनेक दिवसांपासून Tesla च्या RoboTaxi सेवेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही रोबोटॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. स्वतः कंपनीचे CEO इलॉन मस्क(Elon Musk) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लॉन्चिंगची घोषणा केली. मात्र, आता लॉन्चिंगच्या अवघ्या एका दिवसानंतर ही सेवा वादात सापडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही टेस्लाची रोबोटॅक्सी पहिल्याच दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळली. त्यामुळे अमेरिकन वाहन सुरक्षा नियामक एजन्सी NHTSA (नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन) ने याची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. व्हिडिओमध्ये टेस्लाच्या ड्रायव्हरलेस कार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना स्पष्टपणे दिसतात. 

टेस्लाच्या रोबोटॅक्सीबद्दल ही गोष्ट समोर आली
टेस्लाची मॉडेल वाय कार डाव्या लेनमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर पिवळी रेषा ओलांडून लेनमध्ये परत येते. हे अमेरिकन कायद्याने प्रतिबंधित आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, ड्रायव्हरलेस मॉडेल वायमध्ये दोन प्रवासी बसतात आणि स्क्रीनवरील पुल ओव्हर बटण दाबतात, त्यानंतर कार रस्त्याच्या मध्यभागी थांबते, जे खूप धोकादायक मानले जाते. यासोबतच, रोबोटॅक्सीमधून वेगमर्यादेचे उल्लंघन देखील समोर आले आहे. 

Web Title: Tesla's RoboTaxi in controversy on the second day of launch; Government agency starts investigation, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.