टेस्लाचं 'सरप्राईज'! सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारच्या किंमती केल्या कमी, येथे संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:33 IST2025-10-08T13:32:21+5:302025-10-08T13:33:30+5:30
Tesla Price Cut: टेस्लाने त्यांच्या लोकप्रिय कारच्या किंमतीत घट करून ग्राहकांना मोठ सरप्राईज दिले आहे.

टेस्लाचं 'सरप्राईज'! सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारच्या किंमती केल्या कमी, येथे संपूर्ण लिस्ट
अमेरिकेतील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने विक्रीतील घट आणि वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मोठे पाऊल उचलले. कंपनीने त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मॉडेल व्हाय आणि मॉडेल ३ या दोन मॉडेल्स कमी किंमतीत अमेरिकेच्या बाजारपेठेत लॉन्च केले आहेत.
इलेक्ट्रिक कार उद्योगातील इतर कंपन्यांकडून तीव्र स्पर्धा आणि कंपनीचे सह-संस्थापक इलोन मस्क यांच्यावरील कथित बहिष्कारामुळे टेस्लाच्या विक्रीत लक्षणीय घट झाली. या कठीण काळात बाजारपेठेतील वाटा पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात टेस्लाने हे दोन नवीन मॉडेल कमी किंमतीत लॉन्च करण्याचा निर्णय घेतला.
टेस्लाने लॉन्च केलेल्या नवीन आणि जुन्या मॉडेल्सच्या किमती
मॉडेल | व्हेरिएंट | किंमत (डॉलर) |
मॉडेल वाय | स्टँडर्ड | ३९ हजार ९९० डॉलर |
मॉडेल वाय | प्रीमियम रियर-व्हील ड्राइव्ह | ४४ हजार ९०० डॉलर |
मॉडेल वाय | प्रीमियम ऑल-व्हील ड्राइव्ह | ४८ हजार ९९० |
मॉडेल वाय | परफॉर्मन्स ऑल-व्हील ड्राइव्ह | ५७ हजार ४९० |
मॉडेल वाय | नवीन स्टँडर्ड | ३६ हजार ९९० |
मॉडेल ३ | प्रीमियम रियर-व्हील ड्राइव्ह | ४२ हजार ४९० |
मॉडेल ३ | प्रीमियम ऑल-व्हील ड्राइव्ह | ४७ हजार ४९० |
मॉडेल ३ | परफॉर्मन्स ऑल-व्हील ड्राइव्ह | ५४ हजार ९९० |
न्यूयॉर्कमधील ग्राहकांना मोठा फायदा
न्यू यॉर्कर्ससाठी मॉडेल वाय स्टँडर्डची किंमत ३५ हजारांपेक्षा कमी असेल, ज्यामुळे ही कार त्यांच्यासाठी आणखी परवडणारी ठरेल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेस्लाने हे पाऊल उचलले आहे. ही नवीन परवडणारी मॉडेल्स मंदावलेली विक्री पुन्हा सुरू करण्यास मदत करतील, अशी टेस्लाला आशा आहे. मात्र, नवीन मॉडेल्स लॉन्च होऊनही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे.