Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:32 IST2025-11-20T17:31:42+5:302025-11-20T17:32:22+5:30
भारतात टेस्ला मॉडेल वायच्या स्टँडर्ड RWD व्हर्जनची किंमत 59.9 लाख रुपये एवढी आहे. तर लाँग रेंज व्हर्जनची किंमत 67.9 लाख रुपये एवढी आहे.

Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
एलन मस्क यांच्या कंपनीची टेस्ला मॉडेल वाय (Tesla Model Y) याच वर्षी भारतीय बाजारात दाखल झाली आहे. खरे तर या कंपनीहीची ही भारतातील पहिलीच कार आहे. महत्वाचे म्हणजे, आता युरो NCAP कडून या कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आली आहे. यामुळे भारतीय बाजारात या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतात टेस्ला मॉडेल वायच्या स्टँडर्ड RWD व्हर्जनची किंमत 59.9 लाख रुपये एवढी आहे. तर लाँग रेंज व्हर्जनची किंमत 67.9 लाख रुपये एवढी आहे.
युरो NCAP च्या चाचणीसाठी जी 'टेस्ला मॉडेल वाय' वापरण्यात आली, ती लेफ्ट हँड ड्राईव्ह, ड्युअल मोटर AWD कॉन्फिगरेशन असलेली होती. मात्र, सुरक्षा चाचणीचे हे निष्कर्ष राईट-हँड-ड्राईव्ह मॉडेल वाय लाँग रेंज RWD साठीही सेमच असल्याचे युरो NCAP ने स्पष्ट केले आहे. भारतात मॉडेल वायचे हेच मॉडेल उपलब्ध आहे.
असा आहे सेफ्टी स्कोर... असे आहेत सेफ्टी फीचर्स -
टेस्ला मॉडेल वायमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 10 एअरबॅग्ज, ISOFIX, सीट बेल्ट रिमाइंडर, इमर्जन्सी ब्रेक आणि एक ड्रायव्हर अटेंटिव्हनेस मॉनिटर देण्यात आले आहे. युरो NCAP ने टेस्ला मॉडेल वायला चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 93 टक्के रेटिंग दिली आहे. या कारमध्ये अगदी 6 वर्षांच्या मूलालाही उत्तम सुरक्षा मिळू शकते. सेफ्टी असिस्टमध्ये देखील या कारला 92 टक्के रेटिंग मिळाली आहे.
या कारसोबत उत्तर ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम देण्यात आली आहे. टेस्लाच्या या कारमध्ये लेन कीपिंग इंटरव्हेन्शन, स्पीड लिमिट डिटेक्शन आणि युनिव्हर्सल सीट बेल्ट रिमाइंडरही देण्यात आले आहे.