सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 16:33 IST2022-12-08T16:32:43+5:302022-12-08T16:33:22+5:30
Techo Electra Emerge : ही स्कूटर कमी किमतीव्यतिरिक्त आपल्या डिझाइन, फीचर्स आणि रेंजसाठी पसंत केली जाते.

सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये नव-नवीन फीचर्स कंपन्याकडून देण्यात येत आहे. अशाच एका टेको इलेक्ट्रा इमर्ज (Techo Electra Emerge) इलेक्ट्रिक स्कूटरबद्द्ल जाणून घेऊया. ही स्कूटर कमी किमतीव्यतिरिक्त आपल्या डिझाइन, फीचर्स आणि रेंजसाठी पसंत केली जाते.
Techo Electra Emerge Price
टेको इलेक्ट्रा इमर्ज इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 73,079 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड 76,730 रुपयांपर्यंत जाते.
Techo Electra Emerge Battery and Motor
बॅटरी पॅक आणि मोटरबद्दल सांगायचे झाल्यास कंपनीने 60V, 30Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवला आहे. ज्यामध्ये 250W पॉवर असलेली बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. कंपनी या बॅटरी पॅकवर 1 वर्षाची वॉरंटी प्लॅन देते. बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 3 ते 4 तासांत पूर्ण चार्ज होते.
Techo Electra Emerge Range And Top Speed
टेको इलेक्ट्रा इमर्जबद्दल, कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर इलेक्ट्रिक स्कूटर 100 किमीची रेंज देते.
Techo Electra Emerge Braking and Suspension
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक लावण्यात आले असून रिअरमध्ये ड्रम ब्रेकसह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. स्कूटरमधील अलॉय व्हीलसोबत ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहे. सस्पेन्शन सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन जोडण्यात आले आहे. तर रिअलमध्ये ड्युअल मोनो सस्पेन्शन सिस्टीम जोडण्यात आली आहे.
Techo Electra Emerge Features
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने चार्जिंग पॉइंट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सेंट्रल लॉकिंग, रिव्हर्स स्विच, सीटखाली 17.5 लीटर स्टोरेज, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि लो बॅटरी इंडिकेटर यासारखे फीचर्स देण्यात आली आहेत.