शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

दर महिन्याला ४,१११ रूपये देऊन घरी घेऊन जा जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेली TATA ची सेडान कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 4:03 PM

गेल्या काही वर्षांमध्ये देशात सेडान कारचं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सध्या TATA च्या या कारवर मिळत आहेत अनेक भन्नाट ऑफर्स. कार देते २० किमीचं मायलेज.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांमध्ये देशात सेडान कारचं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.सध्या TATA च्या या कारवर मिळत आहेत अनेक भन्नाट ऑफर्स. कार देते २० किमीचं मायलेज.

कम्फर्टसाठी आजकाल अनेक जण सेडान कारला पसंती देताना दिसतात. स्मुथ आणि उत्तम डिझाईन हे सर्वांनाच आकर्षित करत असतं. गेल्या काही वर्षांमध्ये देशात सेडान कारची मागणीही वाढलेली आहे. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी TATA Motors नं आपली सर्वात स्वस्त सेडान कार Tata Tigor वर या महिन्यात मोठा डिस्काऊंट आणि चांगल्या EMI चा ऑप्शन दिला आहे. 

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही ही कार फायनॅन्सवर घेतली तर महिन्याला तुम्हाला 4111 रूपयांचा ईएमआय द्यावा लागेल. NCAP ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. सामान्यपणे ही कार 20.3 किमीपर्यंतचं मायलेज देते. Tata Tigor ही आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग कार आहे. ही कार एकूण सहा व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये XE, XM, XZ, XZ+, XMA आणि XZA+ यांचा समावेश आहे. याची किंमत 5.64 लाखांपासून 7.81 लाखांपर्यंत आहे. कंपनीनं ही कार MPACT 2.0 डिझाइन लँग्वेजवर तयार केली आहे. यामध्ये कंपनीनं नव्या डिझाईनचं बंपर आणि फ्रन्ट ग्रिल दिलं आहे. 

काय आहेत स्पेसिफिकेशन?या कारमध्ये कंपनीनं 1.2 लिटर क्षमतेच्या 3 सिलिंडयुर्क पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. ते 86PS ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यामध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटन, ७ इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. याला तुम्ही अॅपल कार प्ले किंवा अँड्रॉईड ऑटोशी कनेक्ट करू शकता. यामध्ये सेफ्टीचाही विचार करण्यात आला असून यात ABS, EBD, ड्युअल फ्रन्ट एअर बॅग्स, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमांईडरचाही समावेश करण्यात आला आहे. 

टीप : ईएमआयबाबत देण्यात आलेली माहिती अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार आहे. तसंच डिस्काऊंट्स मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहेत. फायनॅन्स बाबत माहितीसाठी नजीकच्या डिलरशी संपर्क साधावा.

टॅग्स :TataटाटाcarकारIndiaभारतMONEYपैसाbankबँकPetrolपेट्रोल