टाटा मोटर्सच्या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट; टियागो, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 17:54 IST2020-12-07T17:50:21+5:302020-12-07T17:54:43+5:30
Tata Motors : या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडान गाड्यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्सच्या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट; टियागो, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर
नवी दिल्ली : टाटा मोटर्सने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. कंपनीने काही निवडक गाड्यांवर जबरदस्त सूट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, 1 डिसेंबरपासून ही ऑफर सुरू झाली असून या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडान गाड्यांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये कन्ज़्यूमर स्कीम, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे.
टाटा टियागोवर मोठी सवलत
टाटा टियागोवर 25 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. तसेच. टाटा आपल्या या मॉडेल्सवर ग्राहकांना विशेष सूट देत असून, त्याची रक्कम अंदाजे 15 हजार रुपयांच्या घरात आहे. तसेच आपल्याला 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही मिळतो.
टिगोरवर 30 हजार रुपयांची सवलत
टिगोर सेडानला जास्त करून 30 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. ज्यात 15 हजार रुपयांपर्यंत ग्राहक योजनेंतर्गत आणि 15 हजार एक्सचेंज ऑफरचाही समावेश आहे.
टाटा हॅरिअर सुद्धा सवलत
टाटा हॅरिअर एक फ्लॅगशिप SUV आहे. हॅरिअरमध्ये तीन प्रकार उपलब्ध आहेत. ज्यात स्टॅडर्ड, डार्क एडिशन आणि कॅमो एडिशनचा समावेश आहे. डार्क एडिशन, कॅमो एडिशन XZ+ आणि XZA+ वर टाटा मोटर्स ग्राहकांना चांगल्या सवलतीची ऑफर देत असून, जवळपास 25 हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट मिळत आहे. तसेच 40 हजार रुपयांपर्यंत बोनस सूट मिळत आहे. SUVच्या CAMO आणि डार्क एडिशन (XZ +आणि XZA + वेरिएंट) वर मान्य नाही. स्पेशल एडिशन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी 40 हजार रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
टाटा नेक्सॉनवर मिळतेय सूट
सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्येही टाटानं इअर अँडच्या निमित्तानं चांगली सवलत दिली आहे. एसयूव्ही काही ठरावीक प्रस्तावांसह उपलब्ध आहे. ज्यात डिझेलच्या मॉडेलवर 15 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. नेक्सॉनच्या पेट्रोल मॉडेलवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.