शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:19 IST

Tata Tiago EV : जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त Tiago EV ची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक कार टियागो (Tiago EV) असणार आहे. कंपनीने याबाबत खुलासा केला आहे. Tiago EV सर्वात आधी ऑटो एक्सपो 2018  (Auto Expo 2018) मध्ये शोकेस करण्यात आला होती, मात्र कंपनीने कार लाँच केली नाही. त्याऐवजी टाटा मोटर्सने Nexon EV, Nexon EV Max आणि Tigor EV लाँच केली आहे. आता जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त Tiago EV ची घोषणा करण्यात आली आहे.

आतापर्यंत कंपनीकडून Tiago EV बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाँच झाल्यावर Tiago EV ही टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाटा मोटर्सजवळ सध्या एक ईव्ही पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दिशेने 3 फेस्ड अप्रोच आहे. ईव्ही कंपनीला अनेक सेगमेंट, बॉडी स्टाइल आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये लाँच करायची आहे. 

कंपनीकडे आधीपासूनच टिगोर ईव्ही (Tigor EV) आहे, जी कॉम्पॅक्ट सेडान आहे आणि नेक्सॉन ईव्ही (Nexon EV ) जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. आगामी Tiago EV ही हॅचबॅक असणार आहे. टाटा मोटर्स कंपनी  Ziptron टेक्नॉलॉजी Tiago EV साठी वापरेल, जी Tigor EV आणि Nexon EV साठी वापरत असल्याची शक्यता आहे. Ziptron टेक्नॉलॉजी  Xpres-T टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक अॅडव्हान्स आहे, जी पूर्वी Tigor EV साठी वापरली जात होती, जी कमर्शियल सेगमेंटमध्ये होती.

कॉस्मेटिकदृष्ट्या, Tiago EV आणि नियमित Tiago मध्ये कोणताही मोठा फरक असणार नाही. Tiago EV ला सिग्नेचर टील ब्लू आणि डेटोना ग्रे मध्ये ऑफर केले जावे. संपूर्ण एक्सटीरिअरसोबत इंटीरिअरमध्ये सुद्धा ब्लू एक्सेंट असतील. टाटा मोटर्सने शुक्रवारी जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त सांगितले की, Tiago EV  हे  Nexon आणि Tigor नंतर इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कंपनीचे तिसरे उत्पादन असेल.

येत्या आठवड्यात किंमत जाहीर होण्याची शक्यता"आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही Tiago EV सह आमच्या ईव्ही सेगमेंटच्या विस्ताराची घोषणा करत आहोत", असे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीची Tiago EV ची किंमत आणि इतर फीचर्स येत्या आठवड्यात जारी करण्याची योजना आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर Tigor EV वरून घेतले जाऊ शकते. हे सामान्य इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसारखे दिसते, परंतु ईव्ही संबंधित माहिती दाखवण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे.

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहनauto expoऑटो एक्स्पो 2020