TaTa Punch Launch Price: टाटा दोन दिवस आधीच ठोसा लगावणार; 18 ऑक्टोबरला Punch लाँच होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 17:58 IST2021-10-14T17:57:09+5:302021-10-14T17:58:03+5:30
TaTa Punch Launch date, Expected Price: टाटाच्या ताफ्यात सध्या दोन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. या रेटिंग ग्लोबल एनकॅपने दिलेल्या आहेत. यात पंचचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

TaTa Punch Launch Price: टाटा दोन दिवस आधीच ठोसा लगावणार; 18 ऑक्टोबरला Punch लाँच होणार
टाटा नेक्सॉन, अल्ट्रॉझच्या निर्भेळ यशानंतर टाटा मोटर्स भारतीय बाजारात मायक्रो एसयुव्ही टाटा पंचचा (TaTa Punch) ठोसा लगावणार आहे. २० ऑक्टोबरला ही छोटी एसयुव्ही लाँच केली जाणार होती. परंतू कंपनीने दोन दिवस आधीच लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वीच Tata Punch या मायक्रो एसयुव्हीचे रिव्ह्यू यायला सुरुवात झाली आहे. तसेच अधिकृत बुकिंगही घेण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. टाटा पंचची किंमतही सोमवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे. टाटा पंचची अंदाजे किंमत ही 5.5 लाख ते 9 लाखांच्या आसपास असणार आहे.
टाटाच्या ताफ्यात सध्या दोन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. या रेटिंग ग्लोबल एनकॅपने दिलेल्या आहेत. नेक्सॉन या कॉम्पॅक्ट एसयुव्ही नंतर हॅचबॅक कार अल्टॉझने फाईव्ह स्टार रेटिंग मिळविल्या आहेत. यामुळे टाटाची पंच देखील या पंक्तीत जाऊन बसणार की नाही यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. कंपनीनुसार या कारची सेफ्टी रेटिंग आणि किंमत लाँचिंगवेळीच जाहीर करणार आहेत. टाटा पंच देखील फाईव्ह स्टार रेटिंगची कार असल्याचे खुद्द टाटाच्याच बॅनरवर लीक झाले आहे.
फिचर्स
टाटा पंचमध्ये एबीएस सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोलची सुविधा असणार आहे. याशिवाय टाटा पंचमध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. इंजिनमध्ये Ram-Air Technology चा वापर केला आहे. यामुळे कार टॉप स्पीडवर खूप चांगलं मायलेज देऊ शकेल. टाटा पंचमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. कार ०-६० किमीपर्यंतचा स्पीड अवघ्या ६.५ सेकंदात गाठते. तर १०० किमी प्रतितास इतका वेग अवघ्या १६.५ सेकंदात गाठेल. ७ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलं आहे. मायक्रो एसयूव्हीला १६ इंचाचे टायर्स आणि तब्बल १८७ एमएम ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. तर कारचे चारही दरवाचे ९० अंशापर्यंत उघडणारे असणार आहेत. जेणेकरुन कारमध्ये सहजपणे प्रवेश करता येईल.