फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:36 IST2026-01-13T13:34:01+5:302026-01-13T13:36:04+5:30
2026 Tata Punch Facelift launched : सुरक्षिततेचा विचार करता, टाटापंच आधीपासूनच दणकट कार मानली जाते. या कारच्या नव्या सर्व व्हेरिअंटमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात येत आहेत. तसेच टॉप व्हेरिएंटमध्ये ३६०-डिग्री HD कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर देखील देण्यात आले आहे.

फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपल्या प्रतिस्पर्धकांचे टेन्शन वाढवले आहे. टाटा मोटर्सने आपली मायक्रो-एसयूव्ही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या लोकप्रिय 'टाटा पंच'चे २०२६ फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. या कारमध्ये डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेसंदर्भा काही खास बदल केले आहेत. या कारची सुरवातीची एक्स शोरून किंमत ५.५९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
लुक बदलला, असं आहे प्रीमियम डिझाइन -
टाटा पंच-२०२६ फेसलिफ्टच्या बाह्य भागास फ्रेश लूक देण्यात आला आहे. याला अपडेटेड एलईडी हेडलॅम्प, ब्लॅक-आउट ग्रिल, नवीन एलईडी डीआरएल आणि एलईडी टेललाइट्ससह रीस्टाईल्ड बंपर देण्यात आले आहे. हिच्या टॉप व्हेरिएंटमध्ये नवीन १६-इंच अलॉय व्हील्स देखील आहेत, यामुळे एसयूव्ही अधिक स्पोर्टी आणि बोल्ड दिसते.
हाई-टेक केबिन अन् अॅडव्हॉन्स्ड फीचर्स -
महत्वाचे म्हणजे या कारची केबीनही अपडेट करण्यात आली आहे. यात २६.०३ सेमीचे अल्ट्रा-व्ह्यू HD टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. जे वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटीला सपोर्ट करते. याशिवाय, वायरलेस फोन चार्जर, ऑटो-डिमिंग IRVM, IRA कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, पॅडल शिफ्टर्स आणि सीएनजी AMT शिफ्टर सारखे प्रीमियम फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या कारचा २१० लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे.
नव्या सर्व व्हेरिअंटमध्ये ६ एअरबॅग्स -
सुरक्षिततेचा विचार करता, टाटापंच आधीपासूनच दणकट कार मानली जाते. या कारच्या नव्या सर्व व्हेरिअंटमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात येत आहेत. तसेच टॉप व्हेरिएंटमध्ये ३६०-डिग्री HD कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, यांसारखी खास सुरक्षा फीचर्सदेखील देण्यात आले आहे.
दमदार इंजिन -
माध्यमांतील वृत्तांनुसार, या टाटा पंच फेसलिफ्टला १२० पीएस पॉवर आणि १७० Nm टॉर्क निर्माण करू शकणारे नवे १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जाऊ शकते. यात १.२-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि ICNG व्हेरिएंटसह देखील ऑफर केले जाऊ शकते.
अशी असेल व्हेरिअंट निहाय एक्स-शोरूम किंमत -
पेट्रोल एमटी : स्मार्ट - ५.५९ लाख, प्युअर - ६.४९ लाख, प्युअर+ - ६.९९ लाख, अॅडव्हेंचर - ७.५९ लाख, अकप्लिशड - ८.२९ लाख, अकप्लिशड+ ८.९९ लाख रुपये.
सीएनजी एमटी : स्मार्ट - ६.६९ लाख, प्युअर - ७.४९ लाख, प्युअर+ - ७.९९ लाख, अॅडव्हेंचर - ८.५९ लाख अकप्लिशड ९.२९ लाख रुपये.