Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:25 IST2025-10-21T14:23:24+5:302025-10-21T14:25:48+5:30
Affordable Electric Car: परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
भारतात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि टाटा मोटर्स या क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. जर तुम्ही सध्या बाजारातील सर्वोत्तम आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल, तर टाटा मोटर्सची टाटा पंच ईव्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.
टाटा पंच ईव्हीची ऑन-रोड किंमत अंदाजे ₹१०.५५ लाख आहे. ही कार तुम्ही आकर्षक डाउन पेमेंट आणि सोप्या ईएमआयवर घरी आणू शकता. जर तुम्ही ₹४ लाखांचे डाउन पेमेंट भरले. तर, उर्वरित ₹६.५५ लाख इतकी रक्कम तुम्हाला कार कर्ज म्हणून घ्यावी लागेल. ही कर्जाची रक्कम ५ वर्षांसाठी ८ टक्के वार्षिक व्याजदराने मिळाली, तर तुमचा मासिक हप्ता अंदाजे ₹१३,००० ते ₹१४,००० असेल.
तुम्ही कर्जाची मुदत ७ वर्षांपर्यंत वाढवली, तर तुमचा ईएमआय आणखी कमी होऊन तो सुमारे ₹१०,००० इतका होईल. महत्त्वाचे म्हणजे, कार कर्ज मिळणे हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. तसेच कारची ऑन-रोड किंमत शहरे आणि डीलरशिपनुसार बदलू शकते.
टाटा पंच ईव्हीमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि रेंजसाठी २५ किलोवॅट प्रति तास क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एसी चार्जर वापरून ही कार ३.६ तासांत १० ते १०० टक्के चार्ज होते, तर डीसी फास्ट चार्जरने केवळ ५६ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज करता येते. पंच ईव्ही पूर्ण चार्ज केल्यावर ३१५ किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. इलेक्ट्रिक कार १४० किलोमीटर प्रति तासाचा कमाल वेग गाठू शकते आणि ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेग घेण्यासाठी तिला फक्त ९.५ सेकंद लागतात.