शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

टाटा नेक्सॉन डॉर्क लाँच, किंमत 11.45 लाखांपासून सुरू, इलेक्ट्रिक व्हर्जनची सुद्धा एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 6:01 PM

Tata Nexon Dark EV Launch : लेटेस्ट डार्क एसयूव्ही क्रिएटिव्ह ट्रिम आणि फियरलेस ट्रिममध्ये मिळणार आहे.

Tata Nexon Dark EV Launch (Marathi News) :  टाटा मोटर्सने (Tata Motors) नेक्सॉन डॉर्क आणि नेक्सॉन ईव्ही डार्क व्हर्जन लाँच केले आहे. नवीन एसयूव्ही शानदार लूक आणि स्टाइलमध्ये दिसत आहे. दरम्यान, नेक्सॉन डार्कची एक्स-शोरूम किंमत 11.45 लाख रुपयांपासून सुरू होते, तर नेक्सॉन ईव्ही डार्कची एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख रुपयांपासून सुरू होते. लेटेस्ट डार्क एसयूव्ही क्रिएटिव्ह ट्रिम आणि फियरलेस ट्रिममध्ये मिळणार आहे. याचबरोबर, टाटा कंपनीने हॅरियर आणि सफारीची डार्क रेंजही लाँच केली आहे.

टाटा नेक्सॉन डार्क रेंजची किंमत ट्रिमच्या किमतीपेक्षा जवळपास 35,000 रुपये जास्त आहे. या कारच्या फीचर्समध्ये कोणताही बदल नाही. ज्या व्हेरिंएटवर डार्क एडिशन बेस्ड आहे, तशीच फीचर्स मिळतील. यामध्ये वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसाठी हिडन कॅपेसिटिव्ह टच पॅनल, ब्लॅक लेदर सीट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन नेक्सॉन 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्सनसह मिळणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड एएमटी किंवा 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटो ट्रान्समिशनसह मिळणार आहे. याव्यतिरिक्त, 6 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनसह 1.5 लिटर डिझेल इंजिन ऑप्शन देखील आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशन ही नेक्सॉन ईव्हीच्या टॉप व्हेरिएंट एम्पॉवर्ड + LR ट्रिमवर आधारित आहे. या व्हेरिएंटच्या तुलनेत डार्क एडिशन जवळपास 10,000 रुपयांनी महाग आहे. नेक्सॉन ईव्ही डार्कला 40.5 kWh बॅटरी पॅकची पॉवर मिळेल. एकदा फुल चार्ज केल्यानंतर नेक्सॉन ईव्ही डार्क 465 किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल.

Tata Harrier Dark आणि  Safari Darkटाटाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हॅरियर आणि सफारी या दोन फ्लॅगशिप एसयूव्हीचे डार्क एडिशन लाँच केले होते. आतापर्यंत त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हॅरियर डार्कची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे, तर सफारी डार्कची एक्स-शोरूम किंमत 20.69 लाख रुपये आहे. या दोन्ही एसयूव्ही 2.0 लिटर डिझेल इंजिन आणि 6 स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर