Join us  

श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीने ICC पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेठी १५ सदस्यीय संघ निवडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 7:14 PM

Open in App

श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीने ICC पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेठी १५ सदस्यीय संघ निवडला. या संघाला क्रीडा व युवा व्यवहार मंत्री हरिन फर्नांडो यांनी मान्यता दिली. १४ मे २०२४ रोजी संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धा १ ते २९ जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे मध्ये होणार आहे. श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga ) याच्याकडे सोपवले आहे. आयपीएल २०२४ मध्ये खेळणारे मथीशा पथिराणा, महिश तिक्षणा व नुवान तुषारा यांचाही वर्ल्ड कप संघात समावेश केल्याने त्यांना लीगच्या अंतिम टप्प्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांना धक्का बसला आहे.  

श्रीलंकेने अनुभवी अँजेलो मॅथ्यूजच्या अनुभवाचा आधार घेतला आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीस जानेवारीमध्ये जवळपास तीन वर्षांच्या अनुपस्थितीनंतर T20I सेटअपमध्ये परतला होता. मॅथ्यूजचा हा सहावा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आहे. 

पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 

गटवारी अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

स्पर्धेचा फॉरमॅट...- २० संघ- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी - चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र- सुपर ८मध्ये  ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी - दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत- फायनल

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ - वनिंदू हसरंगा ( कर्णधार), चरिथ असलंका ( उप कर्णधार), कुसल मेंडिस, पथूम निसंका, कमिंदू मेंडिस, सदीरा समराविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, धनंजया डी सिल्वा, महिश तिक्षणा, दुनिथ वेल्लालागे, दुष्मंथा चमिरा, नुवान तुषारा, मथिशा पथिराणा, दिलशान मदुशंका; राखीव खेळाडू - असिथ फर्नांडो, विजयाकांथ विजास्कांत, भानुका राजपक्षा, जनिथ लियानागे 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024श्रीलंका