शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

TaTa Nexon Accident Video: पाचवेळा पलटी मारली, २०० फूट दरीत कोसळली; टाटाच्या कारमधील सारे वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 10:05 IST

TaTa Nexon Accident Video Five Star Safety: सुरक्षिततेच्या बाबतीत या चांगल्या क्रमांकांसह, Tata Nexon ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार म्हणून कायम आहे. अनेकदा या कारने सुरक्षा काय असते हे दाखवून दिले आहे.

टाटा कंपनीने भारतीयांना फाईव्ह स्टार सेफ्टी काय असते हे पहिल्यांदा दाखविले. अत्यंत सुरक्षित वाहने, कार बनवून जगालाही भारत फाईव्ह स्टार सेफ्टीची वाहने बनवू शकतो, याचा विश्वास दिला. ही तीच कार आहे, जिच्या लाँचिंगवेळी ग्लोबल एनकॅपचे सीईओ भारतात आले होते आणि मारुतीला आव्हान देऊन गेले होते. आजवर काही मारुतीला फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार बनविता आल्या नाहीत. पण टाटाने मात्र, तीन कार बनविल्या आहेत. 

टाटाचा दणकटपणा दोन आठवड्यांपूर्वी दिसला. टाटा नेक्सॉनला हिमाचलप्रदेशमध्ये  भीषण अपघात झाला. रस्त्यावरील ब्लॅक आईसवरून घसरल्याने नेक्सॉ़न २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात नेक्स़ॉनने पाचवेळा पलटी खाल्ली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर  व्हायरल झाला आहे. यूट्यूबर निखिल राणा याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अपघातावेळी दोघेजण या कारमध्ये होते. दोघेही सुखरूप असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

आश्चर्याची बाब म्हणजे या मोठ्या अपघातातून दोघेही सुखरूप बचावले आहेत. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार खेचून रस्त्यावर आणण्यात आली. या अपघातात कारलाही फारशी हानी झाली नाही आणि तिची फ्रेम जशीच्या तशीच राहिली, त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. Tata Nexon ही भारतातील पहिली कार आहे जिला ग्लोबल NCAP ने 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे. सुरक्षिततेसाठी कारने 17 पैकी एकूण 16.7 गुण मिळवले आहेत.

सुरक्षिततेच्या बाबतीत या चांगल्या क्रमांकांसह, Tata Nexon ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार म्हणून कायम आहे. या रेटिंगमध्ये SUV सह फुल-चॅनल ABS, दोन सामान्यतः आढळणाऱ्या एअरबॅग्ज आणि सीटबेल्ट रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये मोठी भूमिका बजावतात. ही अशी काही पहिलीच घटना नाही, याआधी टाटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या पंच मायक्रो एसयूव्ही कारचाही वेगात मोठा अपघात झाला होता. ज्यामध्ये टाटा पंचचे मोठे नुकसान होऊनही आत बसलेले प्रवासी सुरक्षित होते.

टॅग्स :TataटाटाAccidentअपघात