TaTa Motors: दणकाच! टाटा मारुतीचाच फॉर्म्युला वापरणार; पाच वर्षांत 10 EV, हवी ती घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:12 PM2021-10-13T22:12:14+5:302021-10-13T22:14:59+5:30

TaTa Motors Electric Vehicle Launch plan: इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात मजबूत पाय रोवण्यासाठी टाटा मोठा प्लॅन घेऊन आली आहे. नवीन उपकंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीचे सध्याचे नाव हे EVCo आहे. खरे नाव काही दिवसांत जाहीर होईल.

TaTa Motors will use Maruti's formula; 10 EVs in next five years, take what you want ... | TaTa Motors: दणकाच! टाटा मारुतीचाच फॉर्म्युला वापरणार; पाच वर्षांत 10 EV, हवी ती घ्या...

TaTa Motors: दणकाच! टाटा मारुतीचाच फॉर्म्युला वापरणार; पाच वर्षांत 10 EV, हवी ती घ्या...

Next

भारतात इलेक्ट्रीक वाहनांना मागणी प्रचंड वाढू लागली आहे. डझनभर कंपन्यांमध्ये टाटाने (TaTa Motors) बाजी मारली असून भविष्य लक्षात घेत ईलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी टाटामारुतीच्या (Maruti Suzuki) फॉर्म्युल्याने जाणार आहे. येत्या 5 वर्षांत टाटा भारतीय ग्राहकांसमोर 10 ईलेक्ट्रीक कार (Electric Car) ठेवणार असून हवी ती घ्या, असाच हा प्रकार असणार आहे. 

मारुतीने भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन त्यांच्या खिशाप्रमाणे वेगवेगळ्या किंमतीच्या कार बाजारात आणल्या. ज्याला अल्टो परवडते त्याने अल्टो घेतली, ज्याला सेलेरिओ त्याने ती घेतली, ज्याला ए स्टार परवडत होती त्याने ती घेतली. त्यानंतर मारुतीने स्विफ्ट, डिझायर, अर्टिगा आणली. त्यानंतरच्या ग्राहकांसाठी ब्रेझा आणि आता नेक्सा ब्रँड असा पंधरा- वीस वाहनांचा ताफाच समोर ठेवला. तोच फॉर्म्युला अंमलात आणण्याची मोठी संधी आता इलेक्ट्रीक वाहनांमुळे टाटासमोर आली आहे. 

टाटा यासाठी नवीन उपकंपनी काढणार असून यामध्ये दोन कंपन्या 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. टाटाच्या या नव्या EV Subsidiary चे तात्पुरते नाव हे EVCo आहे. भविष्यात ही कंपनी 10 हून अधिक इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. आधीच टाटाकडे दोन ईव्ही कार आहेत. लवकरच टाटाच्या या नव्या कंपनीचे नाव जाहीर होईल. परंतू कंपनी जरी नवीन असली तरी ती टाटा मोटर्सच्याच अधिपत्याखाली असणार आहे. EVCo कडे कारची डिझायनिंग आणि आयपीची जबाबदारी असेल आणि त्याचे उत्पादन, विक्री आणि अन्य बाबी या टाटा मोटर्सकडेच असणार आहेत.

एका ऑटो न्यूज चॅननला टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी सांगितले की, 2026 पर्यंत टाटा मोटर्स 10 ईलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. आम्ही ग्राहकांसमोर खूप सारे पर्याय ठेवणार आहोत. त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे कार घेता येईल.

संबंधित बातम्या...

Tata Motors: पडत्या काळात साथ दिली! टाटा मोटर्सने केले गुंतवणूकदारांना मालामाल, 1 लाखाचे झाले 8 लाख

एकदा चार्ज करा, मुंबई-पुणे-मुंबई चार फेऱ्या मारा; Triton Electric Car भारतात सादर

 

Web Title: TaTa Motors will use Maruti's formula; 10 EVs in next five years, take what you want ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.