शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 4:33 PM

TATA Motors ची ही कार ठरली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक प्रवासी कार. सध्या देशात इलेक्ट्रीक कार्सची वाढतेय मागणी. 

ठळक मुद्देTATA Motors ची ही कार ठरली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक प्रवासी कार. सध्या देशात इलेक्ट्रीक कार्सची वाढतेय मागणी. 

सध्या देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशातच देशात आता इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. टाटा मोटर्सनं देशात आपली इलेक्ट्रीक कार Nexon EV लाँच केल्यानंतर त्या कारला उत्तम मागणीही मिळत आहे. तसंच Nexon EV ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. 

दरम्यान, आपल्या डिझेल गाडीच्या विक्री इतकी Nexon EV ची मागणी वाढल्याचा दावा टाटा मोटर्सनं केला आहे. "जुलै २०२१ मध्ये Nexon EV ची डिझेल व्हेरिअंट इतकीच विक्री झाली," अशी माहिती एका पत्रकार परिषदेदरम्यान टाटा मोटर्सचे चीफ फायनॅन्शिअल ऑफिसर पीबी बालाची यांनी दिली. FAME-II बेनिफिट्समुळे आणि राज्य सरकारांकडून देण्यात येणाऱ्या सब्सिडीमुळे ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांकडे आकर्षित होत असल्याचं ते म्हणाले. 

२०२५ पर्यंत १० इलेक्ट्रीक वाहनंनेक्सॉन ईव्हीची विक्री ही लवकरच एकूण विक्रीच्या ५ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा कंपनीकडून करण्यात येत आहे. २०२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्सनं नेक्सॉन ईव्हीच्या एकूण १,७६६ युनिट्सची विक्री केली आहे. तर यादरम्यान कंपनीच्या एकूण ५३,८०० गाड्यांची विक्री झाली. दरम्यान नेक्सॉन ईव्हीची वाढती विक्री पाहून कंपनीनं २०२५ पर्यंत एकूण १० इलेक्ट्रीक व्हेईकल्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कारची ड्रायव्हिंग रेंज उत्तम असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. या कारसोबत फास्ट चार्जरही देण्यात येत असून एका तासात बॅटरी ८० टक्के चार्ज होते.

टॅग्स :TataटाटाcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत