Cheapest Electric Car India : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; रेंज 200 किमी, किंमत 5 लाखांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:07 IST2022-07-26T17:03:21+5:302022-07-26T17:07:39+5:30
Cheapest Electric Car India : ही Storm R3 ही अतिशय छोटी कार आहे, तिला कंपनीने दोन दरवाजे दिले आहेत.

Cheapest Electric Car India : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; रेंज 200 किमी, किंमत 5 लाखांपेक्षा कमी
नवी दिल्ली : भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कार निर्मात्यांनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक कारच्या सध्याच्या रेंजमध्ये टाटा मोटर्स व्यतिरिक्त, एमजी मोटर्स, महिंद्रा, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या कंपन्यांच्या कारची संख्या सर्वाधिक आहे.
भारतात इलेक्ट्रिक कारला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे, परंतु बरेचदा जास्त किंमतीमुळे लोक या कार खरेदी करू शकत नाहीत. जर तुम्हीही बजेटच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकत नसाल, तर भारतातील सर्वात कमी किमतीच्या दोन सीटर इलेक्ट्रिक कारची संपूर्ण माहिती जाणून घ्या. येथे आम्ही स्ट्रॉम मोटर्सच्या एका नवीन इलेक्ट्रिक स्टार्ट अप इलेक्ट्रिक कार स्ट्रॉम आर 3 (Storm R3) बद्दल बोलत आहोत, जी तीन चाकी दोन सीटर कार आहे.
ही Storm R3 ही अतिशय छोटी कार आहे, तिला कंपनीने दोन दरवाजे दिले आहेत. या कारचे एकूण वजन 550 किलो आहे. तसेच, आकाराने 2,907 मिमी लांब, 1,405 मिमी रुंद आणि 1,572 मिमी उंच केले आहे. यासह 185 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. Strom R3 चार्जिंगच्या बॅटरी आणि मोटरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्यात 13 kW Lithium Ion बॅटरी पॅक सोबत 15 kW पॉवर मोटर दिली आहे. ही मोटर 20.4 PS पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
या इलेक्ट्रिक कारमध्ये बसवलेल्या बॅटरीच्या चार्जिंगबद्दल कंपनीचा दावा आहे, सामान्य चार्जरने चार्ज केल्यानंतर ती 3 तासांत पूर्ण चार्ज होते. याचबरोबर, Strom R3 च्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 80 kms प्रति तासाच्या टॉप स्पीडसह 200 kms ची ड्रायव्हिंग रेंज देते. या कारमध्ये कंपनीने तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत, ज्यात पहिला इको मोड, दुसरा नॉर्मल मोड आणि तिसरा स्पोर्ट्स मोड आहे.
याचबरोबर, कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने कीलेस एंट्री, पॉवर विंडो, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉईस कमांड, क्लायमेट कंट्रोल, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, Strom R3 ची सुरुवातीची किंमत 4.50 लाख रुपये आहे आणि ही एक्स-शोरूम किंमत देखील त्याची ऑन-रोड किंमत आहे.