मध्यमवर्गीयांसाठी खास; लवकरच येणार Ather ची स्वस्त EV स्कूटर! किंमत किती अन् फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:21 IST2025-12-19T17:20:38+5:302025-12-19T17:21:26+5:30
नवीन स्कूटर EL01 कॉन्सेप्टवर आधारित असेल!

मध्यमवर्गीयांसाठी खास; लवकरच येणार Ather ची स्वस्त EV स्कूटर! किंमत किती अन् फीचर्स
Ather EV: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Ather Energy लवकरच नवीन आणि किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या स्कूटरसाठी डिझाइन पेटंट दाखल केले असून, हे मॉडेल लवकरच प्रत्यक्षात येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही स्कूटर Ather EL01 कॉन्सेप्टवर आधारित असणार आहे. सामान्य ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन तयार केली जाईल. Ola Electric सारख्या ब्रँड्सना थेट स्पर्धा देण्याचा हा Ather चा महत्त्वाचा डाव मानला जातोय.
Rizta च्या यशानंतर नवा प्रयत्न
Ather ने आपल्या 450 सीरिजमुळे आधीच मार्केटमध्ये पकड मजबूत केली आहे. त्यानंतर कंपनीने Rizta ही फॅमिली यूजसाठी डिझाइन केलेली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. अल्पावधीतच Rizta भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये सामील झाली. आता, याच मार्गावर पुढे जात Ather आणखी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर सादर करून जास्तीत जास्त लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.
Ather EL01 कधी होणार लॉन्च?
Ather Community Day 2025 मध्ये कंपनीने प्रथमच EL01 कॉन्सेप्ट सादर केले होते. याच कार्यक्रमात Ather ने आपला नवीन EL प्लॅटफॉर्म देखील सादर केला. त्या वेळी लॉन्चची निश्चित तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र, आता डिझाइन पेटंट समोर आल्यानंतर EL01 हा या नव्या प्लॅटफॉर्मवरील पहिला स्कूटर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, 2026 मध्ये EL01 चे अधिकृत लॉन्च होऊ शकते.
डिझाइनमध्ये काय असेल खास?
Ather EL01 चे डिझाइन बर्याच अंशी Rizta प्रमाणे असेल, मात्र ही अधिक साधी आणि किफायतशीर बनवण्यात येईल.
अपेक्षित फीचर्स
LED हेडलाइट
पुढील बाजूस स्लिम LED DRL
स्लीक बॉडी पॅनल
सिंगल-पीस सीट
मागील प्रवाशासाठी बॅकरेस्ट
फ्रंट एप्रनवर इंडिकेटर्स
कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये 7-इंचाची डिजिटल स्क्रीन दाखवण्यात आली होती, जी रायडरला आवश्यक माहिती देईल. एकूणच हा स्कूटर Rizta चा अधिक स्वस्त आणि साधा अवतार ठरू शकतो.
बॅटरी आणि रेंजची अपेक्षा
Ather EL01 मध्ये फ्लोअरबोर्डखाली बॅटरी पॅक देण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन EL प्लॅटफॉर्म 2 kWh ते 5 kWh पर्यंतच्या बॅटरी क्षमतेला सपोर्ट करणार आहे. ग्राहकांना वेगवेगळे बॅटरी पर्याय मिळण्याची शक्यता असून, त्यानुसार स्कूटरची किंमत आणि रेंज ठरू शकते. याची संभाव्य रेंज 150 किमी असेल.