25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:52 IST2026-01-02T11:51:33+5:302026-01-02T11:52:56+5:30
Skoda Auto India : 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये विक्री दुप्पट झाली.

25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Skoda Auto India ने 2025 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इतिहास रचला आहे. कंपनीने आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक विक्री नोंदवत मोठी कामगिरी केली आहे. 2024 मध्ये स्कोडाची विक्री सुमारे 35 हजार युनिट्सपर्यंत मर्यादित होती, तर 2025 मध्ये हा आकडा थेट 72 हजारांहून अधिक झाला आहे. अवघ्या एका वर्षात विक्री दुपटीहून अधिक वाढणे ही स्कोडासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
विशेष म्हणजे, स्कोडा ऑटो इंडियाच्या भारतातील 25 वर्षांच्या प्रवासाच्या टप्प्यावरच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाल्यामुळे हा यशाचा क्षण कंपनीसाठी अधिकच खास ठरतो.
Skoda Kylaq ची सर्वाधिक विक्री
स्कोडाच्या या जबरदस्त यशामागे सर्वात मोठा वाटा आहे कंपनीची नवी कॉम्पॅक्ट SUV Skoda Kylaq चा आहे. लॉन्च होताच कायलॅकने भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आणि अल्पावधीतच ही स्कोडाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 43 हजार Kylaq विक्री झाल्या आहेत. कमी किंमत, प्रीमियम लूक, मजबूत बांधणी आणि हाय सेफ्टी स्टँडर्ड्समुळे Kylaq विशेषतः त्या ग्राहकांसाठी आकर्षण ठरली, जे सुरक्षित आणि दमदार SUV च्या शोधात होते.
इंजिन आणि परफॉर्मन्स
Skoda Kylaq ही SUV खास भारतीय बाजार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते चांगली पॉवर आणि इंधन कार्यक्षमता (मायलेज) यांचा संतुलित अनुभव देते. स्कोडाची ओळख असलेली मजबूत बॉडी, उत्कृष्ट बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी फीचर्सही या कारमध्ये ठळकपणे दिसून येतात.
फीचर्स आणि सेफ्टी
- यात 5-स्टार भारत NCAP सेफ्टी रेटिंग
- 6 एअरबॅग्स
- LED हेडलॅम्प्स
- 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- 8-इंच डिजिटल (व्हर्चुअल) कॉकपिट
- 17-इंच अलॉय व्हील्स
- सनरूफ, वायरलेस चार्जर
- 446 लिटर बूट स्पेस
- रिअर AC व्हेंट्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स
- एम्बिएंट लाइटिंग
अशी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी भारतीय रस्ते आणि ग्राहकांच्या गरजांसाठी उपयुक्त ठरतात. Skoda Kylaq ची किंमत ₹7.55 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन, टॉप व्हेरियंटसाठी ₹12.80 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.