होंडाची ही कार ठरली सर्वात जास्त विकली जाणारी दुसरी कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 17:09 IST2018-03-27T17:09:22+5:302018-03-27T17:09:22+5:30
एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान कंपनीच्या विक्रीत 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.

होंडाची ही कार ठरली सर्वात जास्त विकली जाणारी दुसरी कार
होंडाने गेल्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये आपली क्रॉसओव्हर कार Honda WR-V भारतात लॉन्च केली होती. एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान कंपनीच्या विक्रीत 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. या काळात कंपनीने साधारण 1,56,452 यूनिट्स विकले आहेत. यात एकट्या Honda WR-V चे 50 हजारांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.
यावर कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीईओ Yoichiro Ueno म्हणाले की, ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. Honda WR-V ही कार एक सफल प्रॉडक्ट आहे. भारतात या कारने 50 हजार यूनिटचा आकडा पार केलाय. हे या कारचं यश आहे.
Honda WR-V पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहेत. या कारला मेट्रो शहरामध्ये अधिक पसंती मिळत आहे. यासोबतच टिअर 3 शहरांमध्येही या कारने चांगला व्यवसाय केलाय.
Honda WR-V या कारची विक्री भारतासोबत ब्राझीलमध्येही मोठ्या प्रमाणात झाली. या कारने कंपनीच्या एकूण विक्रीत 28 टक्के योगदान दिलं आहे. जास्त ग्राहकांनी Honda WR-V च्या टॉप VX मॉडेलला पसंती दिली आहे. Honda WR-V य़ा कारची स्पर्धा Maruti Suzuki Vitara Brezza, Ford EcoSport आणि Tata Nexon कार सोबत आहे.