काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 08:04 AM2022-07-07T08:04:57+5:302022-07-07T08:05:22+5:30

वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती मंगळवारी जारी केली. या कंपन्या फॉर्मात मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली.

Sales of four-wheelers and two-wheelers increased | काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात

काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात

googlenewsNext

सेमी कंडक्टरच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्यामुळे जूनमध्ये प्रवासी वाहन विक्रीत तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. वाहन विक्रीत कोणती कंपनी आघाडीवर राहिली आहे हे जाणून घेऊ...

वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती मंगळवारी जारी केली. या कंपन्या फॉर्मात मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली. किआ इंडिया, एमजी मोटर इंडिया, स्कोडा इंडिया यांची विक्रीही उत्तम राहिली. टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री ८७ टक्क्यांनी वाढली आहे. किया इंडियाची विक्री जूनमध्ये ६० टक्क्यांनी वाढून २४,०२४ वाहनांवर गेली. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वोत्तम मासिक घाऊक विक्री ठरली.

का वाढली विक्री? 
सेमीकंडक्टरची टंचाई कमी झाली
कोरोना साथ आटोक्यात
उद्योगाचे अर्थचक्र पुन्हा रुळावर आल्याने कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांसाठी अजूनही प्रतीक्षा यादी आहे

दुचाकी वाहने
आकडेवारीनुसार, दुचाकी वाहनांची विक्री २० टक्क्यांनी वाढून ११,१९,०९६ झाली. गेल्यावर्षी ९,३०,८२५ दुचाकी वाहने विकली गेली होती. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ८९% वाढ झाली.

इलेक्ट्रिक वाहने
टाटा मोटर्सने २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत ९,२८३ इ-वाहनांचीही विक्री केली. जून २०२२ मध्ये ३,२०७ वाहने विकली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री ठरली आहे.

Web Title: Sales of four-wheelers and two-wheelers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.