शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Royal Enfield लाँच करणार इलेक्ट्रीक बाईक; Meteor 350 वर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 10:24 AM

Royal Enfield Electric Bike : काळाप्रमाणे आता पारंपरिक कंपन्याही बदलू लागल्या आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्य़ा त्यांची इलेक्ट्रीक वाहने बनवू किंवा त्यावर काम करू लागल्या आहेत. यामुळे रॉयल एन्फील्डनेही भविष्यात इलेक्ट्रीक बाईक लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. 

ढूक, ढूक ढूक...फायरिंगसाठी प्रसिद्ध असलेली आणि तमाम भाई लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली बुलेट आता कात टाकणार आहे. बुलेट बनविणारी कंपनी रॉयल एन्फील्ड (Royal Enfield) आता इलेक्ट्रीक बाईक (Electric Bike) लाँच करणार आहे. आता हा सायलेन्सरच्या आवाजाची सोय कंपनी करणार की नाही याकडेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

काळाप्रमाणे आता पारंपरिक कंपन्याही बदलू लागल्या आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्य़ा त्यांची इलेक्ट्रीक वाहने बनवू किंवा त्यावर काम करू लागल्या आहेत. यामुळे रॉयल एन्फील्डनेही भविष्यात इलेक्ट्रीक बाईक लाँच करण्याची घोषणा केली आहे. 

नुकतीच एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर Royal Enfield Meteor Electric Variant ची झलक दिसली होती. या बाईकचा लूक एकदम झक्कास आहे. कंपनीने या इलेक्ट्रीक बाईकच्या मॉडेलबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, मीटियर 350 च्या इलेक्ट्रीक व्हर्जनवरून बाजारात गरमागरम चर्चा रंगू लागल्या आहेत. 

रॉयल एन्फील्ड २०२३ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच करू शकते. ही बाईक कोणती असेल हे अद्याप माहिती नसले तरीही सध्या बाजारात असलेल्या बाईकपैकी कोणतीतरी एक बाईक इलेक्ट्रीक असणार आहे. इंडियन ऑटो ब्लॉग डॉट कॉम वर रॉयल एनफील्ड मीटियर 350 च्या डमी इलेक्ट्रीक मॉडेलची झलक दिसली आहे. ही बाईक ड्युअल टोन कलर थीममध्ये आहे. जी निळ्य़ा आणि पांढऱ्या रंगामध्ये आहे. रेट्रो डिझाईवनच्या या बाईकचे इंजिन आणि चेसिस वेगळ्या डिझाईनचे आहेत. 

कशी असेल बाईक?रॉयल एन्फील्डच्या या येणाऱ्या बाईकचा फ्यूअल टँकचा वरचा हिस्सा पांढरा आणि खालचा हिस्सा निळ्य़ा रंगात असून शकतो. सोबत व्हील रिम्समध्ये ब्लॅकसोबत ब्ल्यू टच दिसू शकतो. रॉयल एन्फील्डमध्ये मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे. कारण सध्याची इंजिन क्षमता पाहता ग्राहकांना तो ताकदीचा फिल देण्यासाठी एवढ्या मोठ्या बॅटऱ्या गरजेच्या आहेत. तसेच कंपनीच्या नावासोबत EV असे लिहिलेले असू शकते. आता ग्राहक या नव्या बाईकला कशी पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अद्याप दोन-तीन वर्षे असली तरीही ही धाकड बाईक नव्या पिढीच्या तरुणांना आवडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन