शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 16:42 IST

Renault Electric Motorcycle Launch : रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे.

Renault Electric Motorcycle Launch :  रेनॉल्टने पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. रेनॉल्टच्या इलेक्ट्रिक कारनेच नव्हे तर इतर प्रोडक्टसनेही ऑटो इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले आहे. या मोटर शोमध्ये, रेनॉल्टने हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरची झलक दाखवली. जी एक इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. या ईव्हीची किंमत 23,340 युरो आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 21.2 लाख रुपये आहे. तर भारतात मिळणाऱ्या Mahindra Scorpio N ची किंमत या ईव्ही पेक्षा कमी आहे. स्कॉर्पिओची एक्स-शोरूम किंमत 13.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते.

रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत भारतात मिळणाऱ्या ईव्हीपेक्षा खूप जास्त आहे. या मोटरसायकलचे फक्त लिमिटेड मॉडेल बाजारात आणले आहेत. कंपनीने या मोटरसायकलचे बुकिंगही सुरू केले आहे. तुम्ही आज ही मोटरसायकल बुक केल्यास, त्याची डिलिव्हरी 2025 मध्ये मिळू शकते. दरम्यान, रेनॉल्टने या मोटर शोमध्ये एक मिनी-कॅरव्हॅन, एक विमान आणि एक जलवाहन देखील सादर केले आहे.

दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्धरेनॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकलचे स्टँडर्ड आणि 50 व्हर्जन असे दोन व्हेरिएंट ग्लोबल मार्केटमध्ये आले आहेत. 50 व्हर्जनच्या मॉडेलची किंमत 21.2 लाख रुपये आहे. तर स्टँडर्ड मॉडेलची किंमत 22.7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्टँडर्ड मॉडेलचा टॉप-स्पीड 99 किमी प्रतितास आहे, तर 50 व्हर्जनचा टॉप-स्पीड 45 किमी प्रतितास आहे.

मोटरसायकलची डिझाईनरेनॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल ही निओ-रेट्रो स्क्रॅम्बलर आहे. या मोटरसायकलला एलईडी हेडलाइट्ससोबत एलईडी डीआरएलही बसवण्यात आले आहेत. या मोटरसायकलची सीट सिंगल पीस रिब्ड डिझाइनसह येते. तसेच, रेनॉल्टने आपल्या मोटरसायकलमध्ये खूप मोठा हँडलबार दिला आहे, ज्यात सर्कुलर बार-एंड मिरर आहेत. मोटरसायकलच्या फ्यूल टँकमध्ये ट्रेडिशनल मोटारसायकलसारखे एलिमेंट्स देण्यात आले आहेत.

मोटरसायकलची रेंज किती?या रेनॉल्ट मोटरसायकलमध्ये 4.8 kWh चा बॅटरी पॅक आहे. या मोटरसायकलमध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटरमुळे 10 bhp ची पीक पॉवर मिळते. तसेच, 280 Nm चा पीक टॉर्क मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही रेनॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल सिंगल चार्जिंगमध्ये 110 किलोमीटरची रेंज देते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगRenaultरेनॉल्टelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकmotercycleमोटारसायकल