शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

613Km ची रेंज, केवळ 21 मिनिटांत होईल चार्ज! ही जबरदस्त इलेक्ट्रिक SUV झाली लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 11:08 AM

या कारची इलेक्ट्रिक मोटार 402 bhp ची दमदार पॉवर आणि 650 Nm चा टॉर्क जनरेट करते. महत्वाचे म्हणजे, ही एसयूव्ही केवळ 5.2 सेकंदांतच ताशी 0 ते 100 किमी एवढा वेग धारण करण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीने सर्वच वाहन निर्मात्यांचे लक्ष वेधले आहे. यातच आता पोर्शे या जर्मनीच्या प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनीने भारतीय बाजारात नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही Porsche Macan लॉन्च केली आहे. महत्वाचे म्हणजे, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एकूण दोन व्हेरिअंट्समध्ये येते. मात्र कंपनीने भारतीय बाजारात केवळ Macan Turbo व्हेरिअंटच सादर केले आहे. आकर्षक लुक आणि दमदार बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.65 कोटी रुपये एवढी आहे ठेवण्यात आली आहे.

अशी आहे Porsche Macan :लुक आणि डिझाइनसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही पोर्शेच्या इतर कार प्रमाणेच लक्झरीअस असून विशेष स्पोर्टी फीलसह येते. मॅकन इलेक्ट्रिकचे डिझाइनवर टायकनची छाप आहे. जिला डे टाइम रनिंग लाइट्ससह कूपे प्रमाणे लूक देण्यात आला आहे. इंटेरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये तीन स्क्रीन, यात 12.6 इंचांचे कर्वी इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि स्टँडर्ड 10.9 इंचांच्या इंफोटेनमेंट सिस्टिमचा समावेश आहे. पॅसेंजर्ससाठी एक पर्यायी 10.9-इंचांचे टचस्क्रीन देखील उपलब्ध आहे. 

या कारची इलेक्ट्रिक मोटार 402 bhp ची दमदार पॉवर आणि 650 Nm चा टॉर्क जनरेट करते. महत्वाचे म्हणजे, ही एसयूव्ही केवळ 5.2 सेकंदांतच ताशी 0 ते 100 किमी एवढा वेग धारण करण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या कारची टॉप स्पीड ताशी 220 किमी एवढी आहे. यात 95 kWh क्षमतेचा दमदार बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो कारला सिंगल चार्जमध्येच 613 किमी एवढी रेंज देतो. हिची बॅटरी 270 kW च्या DC चार्जरने चार्ज केल्यास केवळ 21 मिनिटांतच 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. याच बरोबर, मॅकन टर्बो ओव्हरबूस्ट मोडमध्ये 630 बीएचपी आणि 1130 एनएम एवढा पीक टॉर्क जनरेट करते. ही केवळ 3.3 सेकंदांतच ताशी 0-100 किमी एवढा वेग धारण करू शकते आणि ताशी 260 किमी एवढ्या टॉप स्पीडपर्यंत पोहोचते. या मोडमध्ये ड्राइव्ह केल्यास SUV सिंगल चार्जमद्ये 591 किमीची रेन्ज देते. कंपनी या वर्षाच्या अखेरपर्यंत या कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार