शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'या' दिवशी होणार लाँच; किंमत Alto पेक्षा कमी असेल, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 14:40 IST

EAS-E : स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोटोटाइप व्हेरिएंट तयार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : मुंबईतील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक व्हीकल स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिकने 16 नोव्हेंबरला मायक्रो-इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. या कारला  EAS-E असे नाव देण्यात आले आहे. या ब्रँडची इच्छा आहे की, ही कार दररोज लोकांनी वापरावी. पीएमव्ही इलेक्ट्रिक पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (PMV) नावाचा संपूर्ण नवीन विभाग तयार करायचा आहे. EAS-E हे पीव्हीएम इलेक्ट्रिकचे पहिली कार आहे आणि त्याची किंमत 4 लाख ते 5 लाख रुपये असणार आहे.

स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोटोटाइप व्हेरिएंट तयार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. स्टार्टअप सध्या त्यांना लवकरात लवकर उत्पादनात आणण्यासाठी काम करत आहे. पीएमव्ही इलेक्ट्रिकचे संस्थापक कल्पित पटेल म्हणाले, "आम्हाला उत्पादनाचे अधिकृत अनावरण करताना आनंद होत आहे. कंपनीसाठी हा मैलाचा दगड ठरेल, कारण आम्ही एका भारतीय कंपनीने उत्पादित केलेले जागतिक दर्जाचे उत्पादन तयार केले आहे. पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (पीएमव्ही) नावाचा एक नवीन विभाग सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, ज्याचा उद्देश दैनंदिन वापरासाठी आहे."

कार अवघ्या 4 तासांत होईल चार्ज  पीएमव्ही EAS-E तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केली जाणार आहे. सिंगल चार्जवर कारची ड्रायव्हिंग रेंज 120 किमी ते 200 किमी पर्यंत वेगवेगळी असणार आहे. ड्रायव्हिंग रेंज ग्राहकाने निवडलेल्या व्हेरिएंटवर अवलंबून असेल. कारची बॅटरी अवघ्या 4 तासांत चार्ज होईल, असा दावा पीएमव्हीने केला आहे. तसेच, कंपनी 3 kW चा AC चार्जर देत आहे.

कार अतिशय कॉम्पॅक्ट या मायक्रो इलेक्ट्रिक कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी असणार आहे. कारचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल, तर ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी असेल. तसेच, ईव्हीचे कर्ब वजन सुमारे 550 किलो असू शकतो. कार अतिशय कॉम्पॅक्ट आहे आणि शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. याशिवाय, कारच्या लहान आकारामुळे, पार्क करणे देखील सोपे होईल.

कारमधील फीचर्स...फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास पीएमव्ही इलेक्ट्रिक कंपनी म्हणते की, EAS-E मध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, एक यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि सीट बेल्ट यांसारखे फीटर्स मिळतील.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर